रेल्वे रुळावर पडला युवक, चालकानं पाहिलं पण ट्रेन थांबवू शकला नाही आणि मग…

सायबेरियन रेल्वे ट्रॅकवर (Trans-Siberian Railway) -18 डिग्री सेल्सिअसच्या गोठवणाऱ्या थंडी(Extreme Cold Weather)त एक माणूस दारूच्या नशेत झोपला. दरम्यान, ट्रेन त्याच्या अंगावरून गेली. मात्र, रेल्वेच्या धडकेने तो चमत्कारिकरित्या बचावला.

रेल्वे रुळावर पडला युवक, चालकानं पाहिलं पण ट्रेन थांबवू शकला नाही आणि मग...
ट्रान्स सैबेरियन ट्रेन/प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 1:52 PM

सायबेरियन रेल्वे ट्रॅकवर (Trans-Siberian Railway) -18 डिग्री सेल्सिअसच्या गोठवणाऱ्या थंडी(Extreme Cold Weather)त एक माणूस दारूच्या नशेत झोपला. दरम्यान, ट्रेन त्याच्या अंगावरून गेली. मात्र, रेल्वेच्या धडकेने तो चमत्कारिकरित्या बचावला. तो माणूस रुळांच्या मधोमध पडला होता. यासंबंधी रशियाच्या सरकारनं एक व्हिडिओ(Video)ही जारी केला. आणि संबंधित माणूस कसा बचावला हेही सांगितलं. दरम्यान, त्या व्यक्तीला जखमा झाल्या असून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

रुळावर पडली ‘मिरर यूके’च्या वृत्तानुसार, हे प्रकरण रशियाच्या Krasnoyarsk शहरातील आहे, जिथे 36 वर्षीय व्यक्ती Krasnoyarsk-Abakan रेल्वे मार्गावर रुळांमध्ये पडलेल्या अधिकाऱ्यांना आढळून आली. समोरून येणाऱ्या ट्रेनच्या ड्रायव्हरने त्याला पाहिलं होतं, पण त्याला अचानक ट्रेन थांबवता आली नाही. अशा स्थितीत काही अंतर पुढे गेल्यावर ट्रेन थांबली तेव्हा त्या व्यक्तीला पाहण्यासाठी लोक धावू लागले.

दारूच्या नशेत रेल्वेरुळावर पडलेला व्यक्ती

गृह मंत्रालयाने जारी केला व्हिडिओ

रुळावर पडलेल्या व्यक्तीला रेल्वेने धडक दिली असावी आणि त्याचा मृत्यू झाला असावा, अशी लोकांना खात्री होती. मात्र तो माणूस सुखरूप जिवंत होता. रशियाच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्या माणसाला ट्रेनखाली कसे जिवंत वाचवले, ते दाखवले आहे.

जगातील सर्वात थंड क्षेत्र

ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण जगातील सर्वात थंड क्षेत्र आहे (सायबेरिया). तो माणूस सायबेरियन रेल्वे ट्रॅकवर (ट्रान्स-सायबेरियन रेल्वे) पडला होता. ट्रेनमधून बाहेर पडल्यानंतर, क्रू मेंबर्सनी त्याला ब्लँकेट इत्यादींनी उब देण्याचा प्रयत्न केला, कारण त्या वेळी तापमान उणे 18 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते.

अनेक जखमा मात्र गंभीर दुखापत नाही

रिपोर्टनुसार, हा माणूस जवळच्या रेल्वे स्टेशनवर त्याच्या मित्राला भेटायला आला होता. तेथे तो दारू प्यायला. नंतर गोठवणाऱ्या थंडीत तो रेल्वे ट्रॅकवर झोपला. तो जिथे झोपला तो भाग Krol आणि Dzhetka स्थानकांमधला आहे. त्या माणसाला नंतर कुरागिन्स्काया जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, डॉक्टरांनी सांगितले की त्या माणसाला अनेक जखमा झाल्या आहेत. मात्र, कोणतीही दुखापत गंभीर नसून तो धोक्याबाहेर आहे.

Viral Video : लग्नापूर्वी वराने जाहीरपणे मागितले असे काही, वधू लाजली आणि…

Tallest rideable bicycle : अशी बनवली सायकल, की जिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली दखल!

Video : पृथ्वीच्या अत्यंत जवळून गेला बुर्ज खलिफापेक्षा मोठा लघुग्रह, नासानं शेअर केला GIF व्हिडिओ

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.