Viral Video : सर तु्म्ही सदैव असेच शिकवत राहा, विद्यार्थीनीचं वर्ग शिक्षकाला इमोशनल पत्र
"बोलक्या भावना वाचल्या की आपण मुलांना शिकवताना मुलांच्या हृदयात किती मोठं घर केलंय हे अनुभवताना मन अगदी भरून येतं. कामाची पावती असते जणू ही...
मुंबई : “जान्हवीने आपल्या मनातील हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या आहेत. गेली पाच वर्षे जान्हवी माझ्याकडे त्या शिक्षकांकडे शिकत होती. “जान्हवी ज्यावेळी पहिलीला माझ्याकडे आली तेव्हा अत्यंत निरागस, हरहुन्नरी, बडबडी व चंचल स्वभावाची होती. गेल्या पाच वर्षात मात्र तिच्यात खूप बदल झाला आहे. गेली चार वर्षे विद्यार्थ्यांच्या शाश्वत विकासासाठी राबवलेल्या उपक्रमांमुळे (viral story) तिच्या वर्तनात कमालीचा इष्ट बदल झाला आहे. आता ती निरागस, हरहुन्नरी, आज्ञाधारक, मनमिळाऊ व हुशार तर झाली आहेच, शिवाय जानव्हीला लागलेल्या वाचनाच्या सवयीमुळे आता अगदी प्रघल्भ झाल्याचं दिसत आहे असं वर्ग शिक्षकांनी लिहिलं आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral post) झाली आहे. त्याचबरोबर यासोबत त्या विद्यार्थींनीचं (student) पत्र सुध्दा आहे.
“त्याचबरोबर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासामुळे तर तिच्या मनात गणिताबद्दल विशेष आकर्षण निर्माण झालयं. देश- विदेशातील विद्यार्थी, शिक्षक यांना बोलल्यामुळे, प्रश्न विचारल्यामुळे तिच्या मनात विदेशातील संस्कृती तेथील नागरी जीवन, तेथील शिक्षण व्यवस्था इत्यादी गोष्टींबद्दल मनात कुतूहल निर्माण झाल आहे. ती तिच्या सगळ्या समस्या, विचार, मनातील प्रश्न व अडचणी बिनधास्तपणे माझ्यासोबत शेअर करते. शिक्षकांचे खरे मूल्यमापन करणारे निरागस, कोवळे, मनाने अगदी स्वच्छ असे चेहरे हे शिक्षकाच्या समोर बसलेले विद्यार्थीच असतात.” असं देखील शिक्षकाने म्हटलं आहे.
पुढे शिक्षक म्हणतात, “बोलक्या भावना वाचल्या की आपण मुलांना शिकवताना मुलांच्या हृदयात किती मोठं घर केलंय हे अनुभवताना मन अगदी भरून येतं. कामाची पावती असते जणू ही…आपण एक शिक्षक या नात्याने सचोटीने, निष्टीने आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेल्या संस्काररूपी बीजाचे गोड फळ आपले दैवत असलेल्या विद्यार्थ्यांकडून मिळाले की कोणत्याही शिक्षकाला अत्यानंद झाल्याशिवाय राहत नाही” रविंद्र केदार वर्ग शिक्षक यांनी व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं आहे.