रस्त्यात विवस्त्र फिरत होता ‘पीके’, म्हणतो ‘दुसऱ्या जगातून आलोय…’
त्या अवस्थेमध्ये पाहून लोकांना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर परिसरातील लोकांनी त्या पुरुषाची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये दिली. ज्यावेळी त्या पुरुषाची चौकशी पोलिसांनी केली.
मुंबई : राजकुमार हिराणीचा चित्रपट पीके (PK) सगळ्यांना माहित असेल, त्या चित्रपटात अमिर खानने (Amir khan) एक भूमिका निभावली आहे. पीके चित्रपटातील अमीर खानची भूमिका पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरत नाही. ज्यावेळी त्या चित्रपटात अमीर खान जमिनीवरती उतरतो, त्यावेळी तो विवस्त्र अवस्थेत दाखवला आहे. त्याच पद्धतीचा एक पुरुष अमेरिकेमध्ये फ्लोरिडा (America Florida) या शहरात आढळून आला आहे. त्या पुरुषाचं वय 44 वर्षे आहे. तो लोकांच्यामध्ये विवस्त्र फिरत असल्याची बातमी एका वेबसाईटने दिली आहे.
खरी माहिती सुद्धा पोलिसांना सांगितली
त्या अवस्थेमध्ये पाहून लोकांना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर परिसरातील लोकांनी त्या पुरुषाची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये दिली. ज्यावेळी त्या पुरुषाची चौकशी पोलिसांनी केली, त्यावेळी त्याने सांगितलेल्या माहितीमुळे पोलिस सुध्दा हादरुन गेले. त्याने पोलिसांना सांगितले की, तो दुसऱ्या दुनियेतून आला आहे. त्यानंतर त्याने आपली खरी माहिती सुद्धा पोलिसांना सांगितली आहे. तो म्हणतो की, त्याचं नाव जेसन स्मिथ असं आहे. तो फ्लोरिडा शहरातील वेस्ट पाम बीचचा रहिवासी आहे.
तीन ठिकाणी तक्रार दाखल
पोलिसांनी त्या पुरुषाच्या विरोधात तीन तक्रारी घेतल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्मिथने सुरुवातीला जाहीर केलं की, तो दुसऱ्या दुनियेतील आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपली खरी माहिती सांगितली. त्याच्यावरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अशाच पद्धतीचा आणखी एकावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गोष्टीला आता एक वर्षे पुर्ण झालं आहे.