Viral News : ही कसली अंधश्रद्धा, दोन मुलांचं कुत्र्यांसोबत लावलं लग्नं, संपूर्ण गावाला दिलं जेवण
Trending Story : ओडिशा राज्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बालासोर जिल्ह्यातील आदिवासी गावातील दोन अशी लग्न झाली आहेत की, त्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. दोन मुलांची लग्न कुत्र्यांसोबत लावण्यात आली आहेत.
ओडिशा : जगात लग्नाच्याबाबत (wedding story) अनेक गोष्टी आतापर्यंत तुम्ही वाचल्या असतील, कोणी स्वत: सोबत लग्न केलं आहे. तर कोणी बाहुलीसोबत लग्न केलं आहे. परंतु आपल्या देशातील ओडिशा (Odisha) राज्यातील एक प्रकार सगळ्यांसाठी चर्चेचा ठरला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण इतकं चघळलं जात आहे की, या प्रकरणामुळे समाजातील जागृत लोकांना मोठा धक्का बसला आहे. तिथं एका मुलाचं कुत्रीसोबत, तर एका मुलीचं कुत्र्यासोबत लग्न (Human-Dog Marriage) लावण्यात आलं आहे. लोकांच्यात आणि कुत्रा यांच्यात तुम्ही आतापर्यंत अशी प्रकरणं ऐकली असतील, परंतु हे प्रकरण खरं असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे.
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील एका आदिवासी गावात अंधश्रद्धेच्या आधारे दुष्ट आत्म्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी असे दोन विवाह झाल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. मचुआ सिंह यांनी आपल्या 11 वर्षाचा मुलगा तपन सिंह याचा त्यांच्या घरातील एका पाळीव कुत्रीसोबत लग्न लावून दिलं आहे. त्यानंतर मानस सिंह यांनी आपली सात वर्षाची मुलगी लक्ष्मी हीचं लग्न एक पाळीव कुत्र्यासोबत लावून दिलं आहे. मचुआ आणि मानस हे सोनो ब्लॉकमधील बंधन शाही गावातील हो जमातीचे सदस्य आहेत.
या कारणामुळे लावले जाते कुत्र्यासोबत लग्न ?
त्या गावात जन्माला आलेल्या मुलाच्या पहिला दात वरच्या जबड्यात आल्यावर मुलांच्या लग्नासाठी कुत्र्याचा शोध घेतला जातो. आपल्या मुलांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो असा या आदिवासींचा विश्वास आहे. 28 वर्षीय सागर सिंह यांनी सांगितलेली सविस्तर माहिती, झालेली लग्न रात्रभर सुरु होती. सकाळी सातवाजेपर्यंत सामूहिक जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुलाचं लग्न झाल्यानंतर त्यांच्यामध्ये असलेला वाईट आत्मा कुत्र्यांच्या अंगात शिरतो, अशी समाजाची धारणा आहे. हा गोष्टीला कसल्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नसला तरी ही अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या सुरू आहे.
मागच्या महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एका कुटुंबातील दोन कुत्र्यांचं वाजत-गाजत लग्न लावण्यात आलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. जशी एखाद्या लग्नाची सजावट करण्यात येते, त्याचपद्धतीने लग्नाची सजावट केली होती. विशेष म्हणजे मादी कुत्र्याला त्यावेळी निरोप देण्यात आला.