VIRAL VIDEO | रस्त्याच्या मधोमध आईने मुलाला शिकवला धडा, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘जे झालं ते बरोबर’
Inspirational Viral Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आईने मुलाला ज्या पद्धतीने धडा शिकवला आहे. तो प्रकार सगळ्यांना आवडला आहे.
मुंबई : आई-वडिल (Mother Advised Son) आपल्या मुलांसाठी काय-काय करतात हे सगळं तुम्हाला माहित आहे. काहीवेळेला मुलं अशा काही चुका करुन बसतात की, ते त्यांच्या आईला आणि वडिलांना सहन होत नाही. काहीवेळेला आईचं आणि वडिलांचं मन तुटलं जातं अशी परिस्थिती आहे. मुलं सुध्दा आई-वडिलांचं अधिक ऐकत नाही असं दिसून आलं आहे. त्यामुळे आईला किंवा वडिलांना टोकाचा निर्णय घ्यावा लागतो. सध्या सोशल मीडियावर (video viral on social media) एक व्हिडीओ व्हायरल (viral news) झाला आहे. तो व्हिडीओ प्रत्येक आई-वडिलांनी पाहायला हवा. व्हिडीओ एक आई आपल्या मुलाला कशा पद्धतीने धडा शिकवत आहे पाहायला मिळत आहे. हे सगळं पाहण्यासाठी लोकांची रस्त्यावर गर्दी देखील झाली आहे.
सध्या जो काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तो लोकांना अधिक आवडला आहे. आपल्या मुलाला सुरक्षेच्या कारणावरुन आई किती त्रास देत आहे, हे पाहायला मिळत आहे. सध्या लोकांना रस्त्यावरून चालणं सुध्दा अधिक अवघड झालं आहे. कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे रस्त्याने जाताना नेहमी काळजी घेतली जाते. हेल्मेट हे सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या डोक्यात असायला हवं. कारण ते नसेल तर तुम्हाला कधीही गंभीर इचा होऊ शकते. सध्याचा जो एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आईला मुलगा ज्यावेळी रस्त्यात बिना हेल्मेट पाहायला मिळतो, त्यावेळी आईने काय केलंय हे तुम्ही व्हिडीओत पाहा.
तिथं असलेल्या पोलिसांना देखील हा प्रकार लक्षात आलेला नाही. त्यावेळी आई आपल्या पोटच्या मुलाला कशा पद्धतीने ओरडत आहे, हे पाहून पोलिस कर्मचाऱ्यांना हा प्रकार समजतो. व्हिडीओमध्ये आई मुलावर प्रचंड रागावली आहे. त्याचवेळी आईने मुलाला मारहाण देखील केली आहे. त्यावेळी मुलगा इथंच तर जात होतो,अशी आईची समजूत काढत आहे. त्यावेळी आई सांगते की, अपघात काय सांगून होतो काय ? हा व्हिडीओ सोशल मीडियावर @HasnaZarooriHai अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
अभी माता पिता जागरूक हो जाएं तो क्या बात देखिए मा की डांट में एक अच्छा सन्देश जान है तो जहान है कृपया हेलमेट का प्रयोग करें??? pic.twitter.com/88942LATG4
— Hasna Zaroori Hai ?? (@HasnaZarooriHai) May 11, 2023
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, आता आई वडिल जागे झाले तर काय झालं ? हा व्हिडीओ साधारण 2 मिनट 20 सेकंदाचा आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 58 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर १ हजार लोकांनी या व्हिडीओ लाईक सुध्दा केले आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.