Viral : दिवसभर मास्क घालून दमछाक होतेय? कोरियन कंपनीनं बनवलाय Unique Mask!
बराच वेळ मास्क घातल्यानं काही लोकांना श्वसनाच्या समस्या येत आहेत. खाताना आणि पिताना मास्क काढावा लागतो. अनेकांना दिवसभर मास्क घालून दमछाक होते. हे पाहता दक्षिण कोरिया(South Korea)तल्या एका कंपनीनं एक अनोखा मास्क बनवला आहे. हा अनोखा मास्क त्याच्या डिझाइनमुळे जगभरात चर्चेत आहे.
Unique Mask : दोन वर्षांहून अधिक काळापासून कोरोना विषाणू(Corona virus)नं जगभरात हाहाकार उडवला आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा कोरोनानं बळी घेतला आहे. कोरोना टाळण्यासाठी मास्क (Mask) घालण्याचा सल्ला दिला जातो. एक प्रकारे, मास्क आता आपल्या जीवनाचा अनिवार्य भाग झाला आहे. तुम्ही घरी रहा किंवा बाहेर जा, मास्क घालणं आवश्यक आहे. तथापि, काही लोकांना दीर्घकाळ मास्क लावून आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागतं. बराच वेळ मास्क घातल्यानं काही लोकांना श्वसनाच्या समस्या येत आहेत. खाताना आणि पिताना मास्क काढावा लागतो. अनेकांना दिवसभर मास्क घालून दमछाक होते. हे पाहता दक्षिण कोरिया(South Korea)तल्या एका कंपनीनं एक अनोखा मास्क बनवला आहे. हा अनोखा मास्क त्याच्या डिझाइनमुळे जगभरात चर्चेत आहे.
दक्षिण कोरियानं केला तयार
दक्षिण कोरियाच्या आत्मान कंपनीनं हा अनोखा मास्क बनवला आहे. या मास्कची खास गोष्ट म्हणजे तो फक्त नाक झाकतो, तर तो घातल्यानंतर तुमचं तोंड उघडं राहतं. या कारणास्तव त्याला ‘Kosk’ असं नाव देण्यात आलं आहे. जरी हा एक संपूर्ण मास्क आहे, परंतु आपण इच्छित असल्यास, आपण ते पूर्णपणे घालू शकता किंवा आपण तो दुमडून नाकापर्यंत मर्यादित करू शकता.
खास शैली
त्याच्या खास शैलीमुळे, हा मास्क खाताना आणि पिताना खूप प्रभावी आहे. ज्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे त्यांच्यासाठी तो अधिक फायदेशीर आहे. या मास्कला ‘Kosk’ असं नाव देण्यात आलं आहे. कारण ‘Kosk’ हा कोरियामध्ये नाकासाठी वापरला जाणारा ‘को’ आणि मास्क या शब्दाचा संयोग आहे.
कंपनीचा दावा
तुम्हाला हा मास्क विकत घ्यायचा असेल तर तुम्ही अनेक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर खरेदी करू शकता. या मास्कला KF80 टॅग देण्यात आला आहे. कारण यामध्ये फिल्टरसाठी K कोरियन आणि F हे शब्द वापरले आहेत. हे बनवणारी कंपनी दावा करते, की 0.3 मायक्रॉन कण 80 टक्क्यांपर्यंतच्या कार्यक्षमतेनं फिल्टर केलं जाऊ शकतात.
진짜로 나와버린 코스크 pic.twitter.com/p58WrYGFLe
— 무슨 일이 일어나고 있나요? (@museun_happen) January 29, 2022