लिफ्टमध्ये 5 स्विगी डिलिव्हरी बॉईज एकत्र, फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘हाच आहे आयपीएल सामन्याचा खरा आनंद’

एक फोटो सध्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्या फोटोमध्ये 5 स्विगी डिलिव्हरी बॉईज एकत्र आहेत. एका छोट्या लिफ्टमधील त्यांचा फोटो चांगलाचं व्हायरल झाला आहे.

लिफ्टमध्ये 5 स्विगी डिलिव्हरी बॉईज एकत्र, फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'हाच आहे आयपीएल सामन्याचा खरा आनंद'
Swiggy delivery agentsImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 8:37 AM

मुंबई : सध्या आयपीएलचा सीजन सुरु आहे. त्यामुळे क्रिकेटचे चाहते तुम्हाला मोबाईल किंवा टिव्हीच्यासमोर (mobile and tv) पाहायला मिळत असतील. सध्या काही आयपीएलच्या मॅच झाल्या आहेत. रोमांचक मॅच झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील वाढली आहे. आयपीएल सुरु झाल्यापासून काही लोकांनी आपल्या कामाच्यावेळा सुध्दा बदलल्या आहेत. कदाचित महेंद्र सिंग धोनीचं (MS Dhoni) हे शेवटचं आयपीएल असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला क्रिकेट खेळताना पाहण्यासाठी चाहते अधिक व्यस्त असतात. एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक गोष्ट शेअर केली आहे. सध्या आयपीएल (IPL match 2023) सुरु आहे, त्यामुळे ती गोष्ट लोकांच्या मनाला अधिक भेदून जाणारी आहे.

व्यक्तीने मजेशीर पोस्ट लिहिली…

ट्विटर युजर शुभ याने माइक्रो-ब्लॉगिंग साईटवरती एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये 5 स्विगी डिलिव्हरी बॉईज एकत्र दिसत आहेत. एका छोट्याशा लिफ्टमध्ये ते स्वत:ला एकाचवेळी फिट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये शेअर केलेल्या व्यक्तीने मजेशीर पोस्ट लिहिली आहे. “इमारतीतील स्विगी लोकांची संख्या ही आयपीएल सामना किती मनोरंजक होत आहे, याचे थेट संकेत आहेत.”

हे सुद्धा वाचा

आयपीएल मॅच सुरु असताना…

ही पोस्ट आतापर्यंत आठ लाख लोकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर त्यावर अधिक प्रतिक्रिया देखील येत आहेत. लोकं या पोस्टला स्वत:शी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही लोकांना ही पोस्ट पाहून अधिक हसू आलं आहे. एक नेटकरी म्हणतो की, आयपीएल मॅच सुरु असताना प्रत्येक सोसायटीत अशा पद्धतीचं दृष्य पाहायला मिळत आहे. काही लोकांनी डिलीव्हरी बॉयला चांगला संदेश दिला असल्याचं म्हटलं आहे. आणखी काही लोकांनी लिहिलं आहे की, आयपीएल एक मनोरंजन आहे. याचा आनंद आपण एकाचवेळी घेऊ शकतो.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.