Viral Video : वासराला जन्म दिल्यानंतर गायीने असे मानले आभार, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील व्हाल भावूक

गायीला गोमाता म्हटले जाते. तिला आपण कामधेनू देखील म्हणतो. अशा गायीला जेव्हा तिचे वासरु जन्माला येथे तेव्हा तिच्या मातृत्व ओसंडून वहात असते. याची प्रचिती हा व्हिडीओ पाहताना होते.

Viral Video : वासराला जन्म दिल्यानंतर गायीने असे मानले आभार, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील व्हाल भावूक
cow calfImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 8:07 PM

दिल्ली : माणसाच्या सोबत राहणाऱ्या प्राण्यांना माणसांचा चांगलाच लळा लागलेला असतो. हे प्राणी आपल्या मालकावर जीवापलीकडे प्रेम करतात. त्यात माणसाला शेतीसाठी मदत करणाऱ्या गाय आणि म्हैस या मोठ्या पाळीव प्राण्यांचाही ( Domestic Animals ) समावेश आहे. अलिकडे एका हत्तीणीचा व्हिडीओ व्हायरल ( Viral Video ) झाला होता. ती हत्तीण आपल्या पिल्लाला जीवंत करण्यासाठी त्याच्या अंगावर पाणी टाकताना दिसत होती. आता अशाच एका मातेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात गोमाता ( COW ) आपल्या मालकाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना पाहून आपल्यालाही हा व्हिडीओ पाहून अक्षरश: गहीवरुन येईल.

या व्हायरल व्हिडीओत एका गायीला वासरु होण्यासाठी तिच्या मालकाने मदत केली आहे. प्रसवकळा सुरु होताच तिच्या मालकाने गायीचे सुखरुप बाळंतपण करीत तिच्या नुकत्याच जन्माला आलेल्या वासराला तिच्या समोर ठेवले असून मालक त्या वासराला प्रेमाने कापडाने पुसून घेत आहे. ते पाहून ही नुकतीच आई झालेली गाय त्या मालकाच्या हाताला आपल्या जिभेने चाटून आभार व्यक्त करीत आहे. त्यामुळे मालकालाही गहीवरुन आले आहे. मालकही तिच्या डोक्याचे, गालांचे चुंबन घेताना दिसत आहे. तर गाय पुन्हा त्याच्या कपाळाचे आणि डोक्याला जिभेने चाटत आहे. तसेच ती कापडाला खेचून तिच्या नुकत्याच जन्मलेल्या वासरावर ते कापड अंथरायला सांगत आहे.

येथे पाहा व्हिडीओ

Mama cow shows gratitude to the kind man who saved her and helped deliver her calf by u/westcoastcdn19 in AnimalsBeingBros

हा व्हिडीओ रेडीटवर शेअर झाल्यानंतर या व्हिडीओला असंख्य कमेंट येत आहेत. एका युजरने म्हटले की, मी आशा करतोय की या सारखी आणखीन माणसे जगात हवीत. तर अन्य एका युजरने म्हटले की, किती सुंदर आहे की एका जनावर देखील आभार मानायला विसरत नाहीए..तर एका युजरने प्रतिक्रीया नोंदविताना म्हटले आहे की, हे किती वाईट आहे की आपण मानव अशा प्राण्यालाही इजा पोहचवित असतो.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.