Video : बिबट्याला वाचवण्यासाठी स्थानिक सरसावले, सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद
एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. आसाम वन विभागाकडून हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यात वन अधिकारी पांडू लोको यांच्या घराजवळ एका कॉलनीमध्ये भटक्या बिबट्याला वाचवताना दिसत आहेत. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई : अनेक जंगली प्राण्यांचे त्यांच्या शिकारीचे काही व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. आताही असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. आसाम वन विभागाकडून (Assam Forest Department) हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यात वन अधिकारी पांडू लोको यांच्या घराजवळ एका कॉलनीमध्ये भटक्या बिबट्याला वाचवताना दिसत आहेत. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. बिबट्याला वाचवतानाचा हा व्हीडिओ assamforest या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलाय.”गुवाहाटीमधील ‘पांडूच्या लोको कॉलनी’मध्ये एक बिबट्या आढळला. त्याची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली”, असं कॅप्शन त्याला देण्यात आलं आहे.
व्हायरल व्हीडिओ
एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. आसाम वन विभागाकडून हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यात वन अधिकारी पांडू लोको यांच्या घराजवळ एका कॉलनीमध्ये भटक्या बिबट्याला वाचवताना दिसत आहेत. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. बिबट्याला वाचवतानाचा हा व्हीडिओ assamforest या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलाय.”गुवाहाटीमधील ‘पांडूच्या लोको कॉलनी’मध्ये एक बिबट्या आढळला. त्याची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली”, असं कॅप्शन त्याला देण्यात आलं आहे.
A leopard that had strayed into the Loco Colony of Pandu, Guwahati has been successfully rescued.@CMOfficeAssam @ParimalSuklaba1 @ntca_india @assamzoo @amit62sahai @mkyadava pic.twitter.com/YOYZVTkYj2
— Assam Forest Department (@assamforest) April 19, 2022
मिळालेल्या माहिती नुसार, बचावकार्यानंतर बिबट्याला उपचारासाठी आसाममधील प्राणीसंग्रहालयात हलवण्यात आले आहे. मंजू भट्टाचार्य नावाच्या 50 वर्षीय महिलेवर मंगळवारी सकाळी मालीगाव परिसरात बिबट्याने हल्ला केला होता. तिला गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं.
— Assam Forest Department (@assamforest) April 19, 2022
सध्या सोशल मीडियावर आणखी एका व्हीडिओची चर्चा आहे. हा व्हीडिओ आहे वाघाच्या पाण्यातील उडीचा. या व्हीडिओमध्ये एक वाघ चालत्या बोटीतून उडी मारताना दिसत आहे. व्हीडिओमध्ये वाघाने मारलेल्या उडीची सोशल मीडियावर चर्चा आहे. हा व्हीडिओ पाहून अनेकांनी अप्रतिम असेच उद्गार काढले आहेत. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ पश्चिम बंगालच्या सुंदरबनमध्ये शूट करण्यात आला आहे.
That tiger sized jump though. Old video of rescue & release of tiger from Sundarbans. pic.twitter.com/u6ls2NW7H3
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) April 17, 2022
संबंधित बातम्या