Viral : दिव्यांग सहकारी धावपटूला पाणी पाजायला गेली, अन् रेसचा पहिला क्रमांक गमावला, पण लाखोंचे हृदय जिंकले
एका युजरने म्हटले आहे की, या महीला धावपटूने माणूसकी जीवंत ठेवली आहे. भले मग तिने रेस हरली असेल.
Viral : सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल होत असून त्या फोटोत एक महिला धावपटू आपल्या दुसऱ्या पुरूष सहकारी धावपटूला रेस चालू असताना बॉटलमधून पाणी पाजताना दिसत आहे. या शर्यतीत ही महीला अखेर रेस हरते. परंतू प्रेक्षक तिच्या माणूसकीला सलाम करीत टाळ्या वाजवतात. सोशल मिडीयावर मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्वीटर वरून हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. भर शर्यतीतील हार्ट टचिंग क्षण एका फोटोग्राफरने टिपला होता. त्याचा हा फोटो व्हायरल होत असून त्याला लाखो लोकांनी पाहीले आहे.
सोशल मिडीयावर नेहमीच वेगळे फोटो शेअर केले जातात. आता ट्वीटरवरील शेअर झालेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की केनियाची ही धावपटू Kenyan athlete Jacqueline Nyatipei जॅकलीन न्यातीपै आपल्या सहकारी धावपटूला पाणी पाजत आहे. हा फोटो साल 2010 चा आहे. पाणी पाजल्याने या महीला धावपटूचा पहिला क्रमांक हुकला. परंतू संपूर्ण जगाच्या हृदयात तिने स्थान मिळविले.
हा फोटो पाहून तुम्हाला कळेलच. एक चांगला फोटो हा हजारो शब्दांच्या लेखापेक्षा परिणामकारक असतो असे म्हटले जाते. या फोटोतील महीला धावपटूमध्ये माणूसकी ओतप्रोत भरल्याचे दिसत आहे, नाही तर कुणी आपला पहिला क्रमांक आपल्या दमलेल्या दिव्यांग ( अपंग ) सहकाऱ्याला पाणी पाजून कोण गमावेल..! या बोलक्या फोटोला वर्ल्ड ऑफ हिस्ट्री या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
हा पाहा फोटो…
A Kenyan athlete Jacqueline Nyatipei helping a disabled co-athlete to drink water while running in 2010.
She lost her first place but won many hearts. pic.twitter.com/st9O2FpDJn
— World Of History (@UmarBzv) April 21, 2023
एका युजरने म्हटले आहे की, या महीला धावपटूने माणूसकी जीवंत ठेवली आहे. भले मग तिने रेस हरली असेल. परंतू हा फोटो, हा क्षण तिला नेहमी विजयी ठरवत राहील. अन्य एका युजरने म्हटले आहे की हे देवा हा दिव्यांग व्यक्ती पाण्याची बाटलीही पकडू शकत नाहीए…या महीला धावपटू कसे जगावे याचं उदाहरण दिले आहे. या फोटोला बातमी लिहीपर्यंत 1 लाख 38 हजार 100 लोकांनी हा फोटो पाहीला आहे. तर 6 हजार 448 लोकांनी त्याला लाईक्स केले आहे.