पृथ्वीवरील एक मोठा प्राणी हत्ती (Elephant) हा देखील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. हा प्राणी अतिशय शांत स्वभावाचा प्राणी आहे. यासोबतच ते माणसांप्रमाणेच कुटुंबवत्सल आहेत. जंगलात एकटा हत्ती फिरताना तुम्ही क्वचितच पाहिला असेल. हत्तींना नेहमी कळपात राहायला आवडते. माणसांप्रमाणेच त्यांनाही त्यांच्या मुलांशी म्हणजेच पिल्लांशी खूप जवळीक असते. त्यांच्या पिल्लांवर किंवा कळपातील कोणत्याही सदस्याला काही त्रास किंवा समस्या आल्यास अख्खे कळप त्यावर उपाय काढतात.
निसरड्या रस्त्यावरून घसरतं
व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ(Video)मध्ये हत्तींचा कळप जंगलातील खडबडीत वाटेवरून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये त्यांच्या अनेक पिल्लांचाही समावेश आहे. यादरम्यान हत्तीच्या पिल्लाचा पाय घसरून तो रस्त्यावरून नदीच्या दिशेने घसरायला लागतं. हत्तीचे पिल्लू रस्त्याने अनेकवेळा वर येण्याचा प्रयत्न करते, परंतु निसरड्या रस्त्यामुळे त्याला यश येत नाही. अशा स्थितीत पिल्लाला वर आणण्यासाठी एक हत्ती खाली उतरतो आणि तो पिल्लाला वर ढकलतो. ज्यामुळे तो सहज वर येतो.
The social bonding in elephant is one of the strongest. Mother & aunts helps the calf to come up after it slipped. pic.twitter.com/TjOzYAmxGs
— Susanta Nanda IFS (@susantananda3) January 6, 2022
वनसेवेच्या अधिकाऱ्यानं शेअर केला व्हिडिओ
हा व्हिडिओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. जो आतापर्यंत 59 हजार 700हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच या व्हिडिओला 5000हून अधिक लाइक्स आणि 600हून अधिक रिट्विट्सही आले आहेत.
कितने सोशल होते आपस मे सब मिल कर बेबी की मदद करते,गज़ब*
— Kumkumg9* (@g_kumkum) January 6, 2022
हत्तीची स्टाइल आवडली
हत्तीची ही स्टाइल सोशल मीडियावर लोकांना खूप आवडली. लोकांनीही या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने म्हटले, की हत्तीच्या बुद्धीने माझे मन जिंकले आहे. दुसरीकडे, दुसर्या यूझरने लिहिले, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजले, की हत्तीला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी का म्हटले जाते. दुसर्या यूझरने लिहिले, की ‘या व्हिडिओतून माणसाने शिकले पाहिजे.’
Humans need to learn
— Ravi Shankar (@RaviShank06) January 7, 2022