Viral Video : पारदर्शक मासा पाहीला आहे का ? डोळ्यांखेरीज त्याचा कोणताही अवयव दिसत नाही
या व्हिडीओला 14 लाखाहून अधिक व्यूज मिळाले आहे. अनेक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत.
मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : पृथ्वीवर इतक्या प्रकारचे सजिव प्राणी आहेत की त्यातील अनेक सजीव मानवाने अजूनही पाहिलेले नाहीत. भारतातील माणसाला अमेरिकेतील जंगलात कोणते सजीव राहत आहेत हे माहीती नाही. सोशल मिडीयावर अनेकदा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर कधी कधी काही जीव इतके अजीब असतात असतात की आपण त्यांना कधीच पाहिलेले नसते. असाच एक पारदर्शक शरीराचा माशाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खूपच पाहीला जात आहे.
पारदर्शक मासा आहे कसा ?
ट्वीटरवर या माशाचा ( Transparent fish viral video ) व्हिडीओ शेअर होत आहे. ज्या व्यक्तीच्या हातात हा मासा आहे. त्याची बोटे या माशाच्या शरीरातून आरपार दिसत आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या माशाच्या शरीरातील कोणतेही अवयव डोळ्यांनी दिसत नाही.केवळ डोळे दिसत आहेत. या व्हिडीओतील व्यक्ती या अनोख्या माशाला आलटून पालटून दाखवत आहे. परंतू शरीरात काहीही दिसत नाही.
हा पाहा व्हिडीओ…
Transperant fish, cannot see any organs, except the eyes.pic.twitter.com/wFCEzOA1yk
— The Best (@ThebestFigen) August 1, 2023
फेक व्हिडीओचा संशय
या पारदर्शक व्हिडीओला @ThebestFigen या अकाऊंटवरुन ट्वीटरवर व्हायरल केले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये नजर येणारा मासा सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. सोशल मिडीयावर अनेकदा फेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. त्यामुळे हा व्हिडीओ नक्की खरा आहे की खोटा या विषयी समजलेले नाही. परंतू हा माशा जर खरोखरचा असेल तर खूपच आश्चर्यकारक प्रकार म्हटला पाहीजे.
व्हिडीओ व्हायरल होत आहे
या व्हिडीओला 14 लाखाहून अधिक व्यूज मिळाले आहे. अनेक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले आहे की शरीरात कोणताही अवयव नसलेला हा मासा जीवंत कसा ? एकाने म्हटले आहे की या माशाचे शरीराचे अवयव देखील पारदर्शक असावेत. त्यामुळे ते दिसत नसावेत. काही व्यक्तींनी या माशाला नकली म्हटले आहे. कोणताही युजर या माशाचे नाव सांगू शकलेले नाही. नॅशनल जियोग्राफीकचे एक यूट्यूब व्हिडीओ आणि मॉन्टेरे बे अक्वेरियमच्या एका रिपोर्टनूसार निसर्गात एक पारदर्शक मासा असतो. त्याचे नाव बॅरल आय (Barreleye fish) फिश असे आहे. परंतू या व्हिडीओतील मासा अत्यंत वेगळा आहे.