Viral Video : चंद्रयान-3 ला अवकाशात झेप घेताना त्याने पाहिले, आणि तो ठरला भाग्यवान..प्रवासी

या क्षणाचे सर्व भारतीय साक्षीदार ठरले. परंतू एकाने तर त्यावरही कडी केली आहे. त्याला अनोख्या पद्धतीने साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.

Viral Video :  चंद्रयान-3 ला अवकाशात झेप घेताना त्याने पाहिले, आणि तो ठरला भाग्यवान..प्रवासी
chandrayaan-3Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 2:02 PM

मुंबई : भारताचे चंद्रयान-3 चंद्राच्या ( Chandrayaan Mission ) दिशेने निघाल्याने जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांचे ( Isro ) त्यावर लक्ष आहे. भारताच्या या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष असतानाच आता एक चमत्कार घडला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार केवळ आंध्रातील श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ संशोधन केंद्राच्या प्रांगणातील जनता नव्हे तर जगभरातील जिथे कुठे भारतीय रहात असतील त्यांची छाती अभिमानाने फुगली. मात्र एका अवलियाने तर चमत्कारच केला आहे. त्याने या ऐतिहासिक क्षणाला अशा पद्धतीने चित्रबद्ध  केले ही तोच भाग्यवान ठरला.

काल भारताचे चंद्रयान-3 अवकाशात झेपावले. त्यामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. चंद्रयान-2 मध्ये आलेल्या अपयशाने हार न मानता भारतीय तंत्रज्ञानी पुन्हा नव्याने अवकाशात झेप घेतली आहे. चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग केली तर भारत अमेरिका, सोव्हीएट रशिया आणि चीन या देशांनंतर चौथा देश ठरणार आहे. या क्षणाचे सर्व भारतीय साक्षीदार ठरले. परंतू एकाने तर त्यावरही कडी केली आहे. त्याला अनोख्या पद्धतीने साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. तो प्रवासी चेन्नई ते ढाका इंडीगो फ्लाई़टने जात होता.

हा पाहा व्हिडीओ…

चंद्रयान-3 काल शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता आंध्रातील सतिश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून निघाले तेव्हाच हा ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्याचे भाग्य चेन्नईहून उड्डाण केलेल्या इंडीगो फ्लाईट 6E च्या एका भाग्यवान प्रवाशाला लाभले. जसे या चंद्रयान-3 उड्डाणाचे काऊंड डाऊन सुरु झाले तसे फ्लाईटमध्ये पायलटने अनाऊन्समेंट करीत विमानाच्या खिडकीतून पाहायला सांगितले. तसे ढगातून पांढऱ्या रंगाची लकेर उसळत अवकाशात जाताना एका अवलिया प्रवाशाने हा क्षण अलगद आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला. @ChennaiFlights या अकाऊंटने ट्वीटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दीड हजार युजरने रिट्वीट केले आहे. तर 5,446 युजरने लाईक्स केले आहे.

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....