Video | हट्टी बायकोमुळे भयंकर अपघात, ब्रेक मारायला सांगूनही… एक कोटी लोकांनी…
सोशल मीडियावर पती-पत्नीचा एका व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत. मात्र त्यामध्ये ते दोघं भांडताना नव्हे तर वेगळंच काही करताना दिसत आहेत. या व्हिडीओत पत्नीच्या विनंतीनंतर पती तिला बाईक चालवायला शिकवत असल्याचे दिसत आहे.

Husband Wife Viral Video : सोशल मीडियावर पती-पत्नीचा एका व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत. मात्र त्यामध्ये ते दोघं भांडताना नव्हे तर वेगळंच काही करताना दिसत आहेत. या व्हिडीओत पत्नीच्या विनंतीनंतर पती तिला बाईक चालवायला शिकवत असल्याचे दिसत आहे. पत्नी बाईकवर तर बसली बायको बाईकवर बसली होती पण नंतर तिने नवऱ्याचे काहीच ऐकलं नाही. पण त्याचा परिणाम अतिशय भयानक झाला. त्या दोघांचा असा भीषण अपघात झाला ना की तो क्षण ते दोघे आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. पती-पत्नीचा हा व्हिडीओ एक कोटीहून अधिक लोकांनी पाहिला आणि लाखोंनी लाईकही केला.
असं काय आहे त्या व्हिडीओमध्ये, चला जाणून घेऊया..
पत्नीला बाईक शिकवत होता पती
हा व्हिडीओ अवघ्या काही सेकंदाचा असला तरी त्यातून जन्मभराची शिकवण मिळते. बाईक चालवताना काय करावं आणि काय करू नये, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडी. एक महिला डोक्यावर हेल्मेट वगैरे घालून, बाईकवर बसली होती, तर तिचा पती तिला बाईक चालवण्याच्या सूचना देतानाच तिचा व्हिडीओही शूट करत होता. पतीच्या सांगण्यानुसार, बाईकवर बसलेली त्याची पत्नी गिअर टाकते आणि बाईक हळूहळू पुढे जाते. नीट बाईक चालवल्यामुळे पती तिचे कौतुकही करते. मात्र समोरून एक बाईक येताचान दिसताच, तो पत्नीला ब्रेक मारण्यास सांगतो. तसेच थांबण्यासागी सांगतो. मात्र पत्नीने त्याच्या सूचनेकडे काही लक्ष दिल नाही, ना ती बाईक थांबवली. ती तशीच पुढे जात राहिली. अखेर तो दुसरा बाईकस्वार त्या महिलेच्या जवळ पोहोचला आणि जोरदार ठोकर बसून त्या दोघांचा भीषण अपघात झाल्याचे, या व्हिडीओच्या शेवटच्या फ्रेममध्ये दिसले.
View this post on Instagram
अपघात होताच पतीने घेतली धाव
पत्नीचा अपघात झाल्याचे दिसताच पतीने लगेचच तिच्याकडे धाव घेतली आणि तिला उठवले. ती महिला घाबरल्यामुळे ब्रेक लावू शकली नाही आणि त्यामुळेच हा अपघात झाल्याचे, शेवटी लक्षात आले. आत्तापर्यंत हा व्हिडीओ कोट्यवधी लोकांना पाहिला , लाईक्सही भरपूर आले आणि बराच शेअरही झालाय.