Viral Video : कामाच्या शेवटच्या दिवशी एअर होस्टेस भावूक, इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईटमधला व्हीडिओ व्हायरल…
इंडिगो एअरलाइन्सची फ्लाइट अटेंडंट सुरभी नायर यांचा कामाचा शेवटचा दिवस होता. तेव्हा त्या खूप भावूक झालेल्या दिसल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. शेवटची अनाऊंसमेंट करताना त्या भावूक होऊन बोलत होत्या ते पाहून विमानातील प्रवासीही भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : आपला आपल्या कामावर, ज्या ठिकाणी काम करतो त्या जागेवर खूप प्रेम करतो. त्यामुळे आपण काम करत असलेली जागा सोडायची वेळ येते तेव्हा मन भरून येतं. याची प्रचिती देणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंडिगो एअरलाइन्सची फ्लाइट (Indigo Airlines Flight) अटेंडंट सुरभी नायर (Surabhi Nair) यांचा कामाचा शेवटचा दिवस होता. तेव्हा त्या खूप भावूक झालेल्या दिसल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. शेवटची अनाऊंसमेंट करताना त्या भावूक होऊन बोलत होत्या ते पाहून विमानातील प्रवासीही भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हीडिओ पाहणारे लोकही भावूक होत आहेत. तश्या कमेंट या व्हीडिओच्या खाली पाहायला मिळत आहेत.
व्हायरल व्हीडिओ
इंडिगो एअरलाइन्सची फ्लाइट अटेंडंट सुरभी नायर यांचा कामाचा शेवटचा दिवस होता. तेव्हा त्या खूप भावूक झालेल्या दिसल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. शेवटची अनाऊंसमेंट करताना त्या भावूक होऊन बोलत होत्या ते पाहून विमानातील प्रवासीही भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पाहणारे लोकही भावूक होत आहेत. तश्या कमेंट या व्हीडिओच्या खाली पाहायला मिळत आहेत.
या व्हीडिओत सुरभी म्हणतात, “माझ्या आयुष्यात हा दिवस इतक्या लवकर येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्यासाठी माझं घर आणि हे फ्लाईट माझ्या हृदयाचे दोन तुकडे असल्यासारखे आहेत. त्यामुळे आज निरोप घेताना मला खूप जास्त वाईट वाटत आहे.”
View this post on Instagram
हा व्हीडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर या व्हीडिओला साडे तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या सोशल मीडियावर सर्वजण फ्लाइट अटेंडंट सुरभी नायरचे तिच्या स्वभावाचे कौतुक करताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट करत आम्हालाही माझ्या कामाच्या जागेवरून निरोप घेताना खूप वाईट वाटलं असल्याचं कमेंट करून सांगितलं आहे.
संबंधित बातम्या