Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फूटपाथवर बेशुद्ध पडलेल्या कुत्र्याला कसं वाचवलं? Emotional video Viral, नेटकरी भावुक

एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक माणूस फुटपाथ(Footpath)वर बेशुद्ध पडलेल्या कुत्र्याचा जीव वाचवताना दिसत आहे. ही व्यक्ती डॉगीला आपलंच मूल असल्याप्रमाणं वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ कॅलिफोर्नियातल्या लॉस एंजेलिस इथला आहे.

फूटपाथवर बेशुद्ध पडलेल्या कुत्र्याला कसं वाचवलं? Emotional video Viral, नेटकरी भावुक
बेशुद्ध कुत्र्याला सीपीआर देताना व्यक्ती
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 4:54 PM

Man gives CPR to dog : सोशल मीडियात रोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हसवणारे आहेत, तर काही भावुक (Emotional) व्हिडिओ आहेत. याच प्रकारामधला मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर डॉगीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो कोणालाही भावुक करू शकतो. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक माणूस फुटपाथ(Footpath)वर बेशुद्ध पडलेल्या कुत्र्याचा जीव वाचवताना दिसत आहे. ही व्यक्ती डॉगीला आपलंच मूल असल्याप्रमाणं वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हा अतिशय भावुक व्हिडिओ कॅलिफोर्नियातल्या लॉस एंजेलिस इथला आहे. अचानक पार्कच्या बाहेर एक कुत्रा बेशुद्ध पडला. त्यानंतर तिथं असलेल्या माणसानं माणुसकी दाखवत त्या कुत्र्याला वाचवलं. नेटकरी या कृत्याचं कौतुक करत आहेत.

भावनिक व्हिडिओ

अवघ्या 46 सेकंदांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही भावनिक व्हाल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक माणूस फूटपाथवर पडलेल्या कुत्र्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. कुत्रा पूर्णपणे असहाय्य आहे. तो माणूस सतत त्याला CPR (आपत्कालीन परिस्थितीत वापरली जाणारी वैद्यकीय प्रक्रिया, जी जीव वाचवू शकते) देऊन पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे. सीपीआर देऊनही कुत्रा शुद्धीवर येत नाही, तेव्हा ती व्यक्ती तोंडात श्वास देऊन त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न करते. हा माणूस आपल्या मुलाप्रमाणं डॉगीला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

ट्विटरवर शेअर

Goodable नावाच्या अकाऊंटवरून हा अतिशय भावुक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यूझरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की हा माणूस बाहेर फिरायला गेला होता. त्याला फूटपाथवर एक कुत्रा बेशुद्ध पडलेला दिसला. यानंतर तो त्याच्याकडे धावला आणि सीपीआर देऊन कुत्र्याचा जीव वाचवला.

यूट्यूबवरून शिकला सीपीआर

कुत्र्याचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीनं यूट्यूबवरून सीपीआर द्यायला शिकल्याचं सांगितलं. हे तंत्र त्यानं पहिल्यांदा डॉगीवर वापरलं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण या व्यक्तीची स्तुती करताना दिसून येत आहे. मात्र, काही यूझर्सनी कुत्र्यांना मालकांकडून केल्या जाणाऱ्या क्रूर वागणुकीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. कुत्र्यांना सायकलमध्ये साखळदंडाने बांधणं हाही एक प्रकारचा क्रूरपणा असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

ड्रायव्हिंगचा ‘हा’ Video पाहून तुम्ही म्हणाल, आपल्यातही हवं असं कौशल्य; सोशल मीडियावर तुफान Viral

कोळी नव्हे चित्रकारच जणू! पाहणाऱ्यालाही अडकवतो आपल्या ‘जाळ्या’त, Video Viral

मुंबईतली एक झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्टच्या प्रॉडक्ट डिझाइन मॅनेजर! वाचा, महिलेचा थक्क करणारा असा प्रेरणादायी प्रवास

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.