Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रायव्हिंगचा ‘हा’ Video पाहून तुम्ही म्हणाल, आपल्यातही हवं असं कौशल्य; सोशल मीडियावर तुफान Viral

तुम्ही अनेक ड्रायव्हर्स पाहिले असतील. असा ड्रायव्हर(Driver)ही तुम्ही पाहिला असेल की जो छोट्याशा जागेतूनही कट मारून गाडी वेगात पळवतो. हे करणं प्रत्येकाला जमत नाही. पण सध्या सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळत आहे.

ड्रायव्हिंगचा 'हा' Video पाहून तुम्ही म्हणाल, आपल्यातही हवं असं कौशल्य; सोशल मीडियावर तुफान Viral
कौशल्यपूर्ण पद्धतीनं ड्रायव्हिंग
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 4:22 PM

Driving skill : तुम्ही अनेक ड्रायव्हर्स पाहिले असतील. असा ड्रायव्हर(Driver)ही तुम्ही पाहिला असेल की जो छोट्याशा जागेतूनही कट मारून गाडी वेगात पळवतो. हे करणं प्रत्येकाला जमत नाही. पण सध्या सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळत आहे. असं सांगितलं जात आहे, की गाडीच्या आत एक पॅरामेडिक आहे, जो आपत्कालीन परिस्थितीत आपली कार चालवत आहे. हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे, की तुम्हीही या ड्रायव्हरचे फॅन व्हाल. या पॅरामेडिकच्या ड्रायव्हिंग कौशल्याचे सध्या सोशल मीडियाचे लोक वेडे झाले आहेत. गाडीच्या आत कोण बसलं आहे ते कळलं नाही. मात्र त्यांचं कार चालवण्याचं तंत्र लोकांनी पसंत केलं आहे. हा व्हिडिओही याच ड्रायव्हिंगच्या वेगात व्हायरल होतोय.

वेगानं कापतोय

होत असलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही ड्रायव्हरला स्टीयरिंग व्हील अतिशय जोरात फिरवून मुख्य रस्त्यावर येताना पाहाल. यानंतर, त्याच्या आश्चर्यकारक ड्रायव्हिंग कौशल्याचं प्रदर्शन घडतं. व्हिडिओ गेम सुरू असल्याप्रमाणं तो भरधाव वेगानं वाहनं कापत रस्त्यानं जात राहतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या ड्रायव्हिंगचं नक्कीच आश्चर्य वाटेल.

इन्स्टाग्रामवर शेअर

अप्रतिम ड्रायव्हिंग कौशल्य असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर pubity नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय, की या पॅरामेडिकचं ड्रायव्हिंग कौशल्य अविश्वसनीय आहे.’ हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या जगात धुमाकूळ घालतोय. इन्स्टाग्रामवर एक दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 मिलियनहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. हा आकडा सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Pubity (@pubity)

‘आश्चर्यकारक, अविश्वसनीय’

एका यूझरनं कमेंट करताना लिहिलंय, की आश्चर्यकारक, अविश्वसनीय. हे पाहून मला वाटलं, की ड्रायव्हिंग व्हिडिओ गेम चालू आहे. ड्रायव्हरचे कौतुक करताना, दुसऱ्या यूझरनं कमेंट करताना लिहिलंय, की ‘अब तक की सबसे इलिगल लीगल ड्राइविंग.’ आणखी एका यूझरनं कमेंट करताना लिहिलंय, की पॅरामेडिक्स ड्रायव्हिंग कौशल्यं आश्चर्यकारक आहेत. अगदी छोट्या ठिकाणीही अप्रतिम ड्रायव्हिंग करतात.

Shocking Video : काळ आला होता, पण… पाहा, ट्रकच्या चाकाखाली जाता जाता कसा वाचला युवक

Amazing Skating Video : स्केटिंगही आणि स्टंटही! पण तुम्हाला माहितीये का ‘ही’ व्यक्ती पाहूही शकत नाही

Video : ‘ही’ आग लागली नाही, तर लावलीय; शिकागोतल्या रेल्वेरुळाच्या आगीचं काय आहे सत्य? वाचा…

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.