Video | सोन्याची ‘अशी’ तस्करी कधी पाहिलीये का?, सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया

आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे सोन्याची एक चेनची तस्करी केली जात आहे.

Video | सोन्याची 'अशी' तस्करी कधी पाहिलीये का?, सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया
मुंग्या अशा प्रकारे सोन्याच्या चेनची तस्करी करत आहेत.
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 9:16 PM

मुंबई : सोशल मीडियाचं विश्व प्रचंड व्यापक आहे. येथे रोज लाखे व्हिडीओ, फोटो अपलोड केले जातात. रोज नवनवीन ट्रेंड निर्माण होतात. सामान्य माणसापासून ते महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीसुद्धा आजाकाल समाजमाध्यमांवर सक्रिय आहेत. आयएएस, आयपीएस अधिकारीसुद्धा ट्विटरसारख्या माध्यमावर कायम सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अशाच एका आयपीएस अधिकाऱ्याने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (viral video of ant carrying gold chain IPS officer posted video)

आयपीएस अधिकाऱ्याकडून व्हिडीओ ट्विट

आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे सोन्याच्या एका चेनची तस्करी केली जात आहे. बरं ही तस्करी एखाद्या माणसाकडून केली जात नाहीये. तर चक्क मुंग्या सोन्याच्या चेनवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. दीपांशू काबरा यांनी हा मजेदार व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा होत आहेत. व्हिडीओ शेअर करताना काबरा यांनी ‘सोन्याची तस्करी करणारे सर्वात लहान तस्कर’ असे समर्पक आणि मजेदार असे कॅप्शन लिहले आहे. त्यांनी हा व्हिडीओ ट्विट करताच, अनेकांनी वेगवेगळ्या प्रतक्रिया व्यक्त केल्या आहेत.

व्हिडीओमध्ये काय आहे?

काबरा यांनी ट्विटर केलेल्या व्हिडीओमध्ये काही मुंग्या सोन्याची चेन पळवताना दिसत आहेत. यामध्ये आपलं काम त्या अगदीच मनातून करत असून मुंग्या ही चेन का नेत असाव्यात असा प्रश्न सर्वांना पडतोय. काबरा यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये अगदीच रॉकिंग संगीत ऐकायला मिळत आहे. या मुंग्या कोणतं तरी मोठं आणि महत्त्वाचं काम करत असाव्यात असं हा व्हिडीओ पाहताना वाटून जातं. सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया

दरम्यान, हा व्हिडीओ काबरा यांनी शेअर केल्यानंतर अनेक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काहींनी या मुंग्या आपल्या मुलांसाठी ही चेन नेत असल्याचं म्हटलंय. तर काहींनी हे सर्वांत लहान तस्कर असून त्यांना पकडणे सर्वांत अवघड असल्याचं म्हटलंय. सोशल मीडियावर या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

VIDEO | चालत्या रेल्वेत चढत होता माणूस, पुढे जे झालं ते अतिशय हादरवणारं, पाहा व्हिडीओ

VIDEO| हत्तीचा फोटो काढण्याच्या नादात जीव आला धोक्यात; व्हिडीओ व्हायरल

माझी आई 82 व्या वर्षीही 20 पुश अप्स मारते, मिलिंद सोमणचं चाहत्यांना फिटनेस चॅलेंज

(viral video of ant carrying gold chain IPS officer posted video)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.