Video : हाडे गोठवणाऱ्या थंडीत बीएसएफ जवानाचे पुश-अप्स, तुम्हालाही वाटेल अभिमान
भारतीय सैन्य (Indian Army) हे जगातील सर्वात धाडसी सैन्यांपैकी एक मानलं जातं. आपले जवान सीमेवर (BSF Jawan) उभे आहेत, त्यामुळेच आपण देशाच्या आत सुरक्षित आहोत. कडाक्याच्या थंडीतला जवानाचा एक व्हिडिओ समोर आलाय.
BSF Jawan Video : भारतीय सैन्य (Indian Army) हे जगातील सर्वात धाडसी सैन्यांपैकी एक मानलं जातं. ज्यांच्या शौर्याच्या कहाण्या वेळोवेळी आपल्या कानी पडत असतात. आपले जवान सीमेवर (BSF Jawan) उभे आहेत, त्यामुळेच आपण देशाच्या आत सुरक्षित आहोत, कोणत्याही भीतीशिवाय आरामात कुठेही फिरत आहोत, मजा करत आहोत, हे आपणा सर्वांना माहीत आहे. सीमेवरचे सैनिक आमच्यासाठी, आमच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस जागे असल्यानं आम्ही आमच्या घरात शांतपणे झोपू शकतो. त्यांच्यासाठी ना उन्हाळा आहे ना हिवाळा, ना बर्फाळ थंडी ना पाऊस. आता या प्रकारामधला समोर आलेला व्हिडिओ (Video)पाहून सर्वांनाच अभिमान वाटेल. कडाक्याच्या थंडीत जवानानं इतकं धाडस दाखवलं, की सगळ्यांची छाती अभिमानानं फुलेल. हा व्हिडिओ खूप वेगानं व्हायरल होतोय.
पुश-अप केले
व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण पुश-अप करताना दिसतोय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बीएसएफ जवानानं बर्फावर एका मिनिटात 47 पुश-अप्स केल्याचं दिसत आहे. ज्या थंडीत हाडंदेखील गोठतात, तिकडे बीएसएफच्या जवानांनी पूर्ण उत्साहानं पुशअप्स केले. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडलाय.सर्व पोस्टवरील लाइक्स आणि कमेंट्सवरून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. याच कारणामुळे हा व्हिडिओ इंटरनेटवरही व्हायरल झाला आहे.
ट्विटरवकर शेअर
हाच व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ BSFनं शेअर केला आहे. बीएसएफनं हे ट्विट FitIndiaChallengeसोबत शेअर केला आहे. हा व्हिडिओ तीस हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्सही केल्या आहेत.
40 seconds. 47 push ups. Bring it ON.#FitIndiaChallenge@FitIndiaOff@IndiaSports @@PIBHomeAffairs pic.twitter.com/dXWDxGh3K6
— BSF (@BSF_India) January 22, 2022
‘जवान बर्फाळ सीमेवरही ताठ मानेनं उभे’
एका यूझरनं लिहिलंय, की आम्ही घरात बसून कुडकुडत आहोत, पण जवान बर्फाळ सीमेवरही ताठ मानेनं उभे आहेत. त्याचवेळी, दुसर्या यूझरनं लिहिलंय, की जगातील सर्वात कठीण गोष्ट ही आहे की, खराब हवामानातही सैनिक सीमेवरून हलत नाही. हे काम साध्या माणसाचं नाही.