Viral Video: काय याचं प्रेम? मेट्रो ट्रेनमध्येच गर्लफ्रेंडने बायफ्रेंडच्या थडाथड थोबाडीत मारल्या; टी-शर्ट वरु झालं भांडण

नवी दिल्ली : एका कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल(Viral video) झाला आहे. मेट्रो ट्रेनमध्येच(Delhi Metro ) या जोडप्याचे भांडण सुरू झाले. या दोघांमध्ये काहीतरी बाचाबाची होते. मग, काय चिडलेली गर्लफ्रेंड थेट बॉयफ्रेंडला मारायला सुरुवात करते. ट्रेनमध्ये असलेले इतर प्रवासी यांचे भांडण पाहून त्यांच्याकडे पाहतच राहिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. मात्र, कोणीही यांचं भांडण सोडवण्यासाठी पुढे […]

Viral Video: काय याचं प्रेम? मेट्रो ट्रेनमध्येच गर्लफ्रेंडने बायफ्रेंडच्या थडाथड थोबाडीत मारल्या; टी-शर्ट वरु झालं भांडण
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 8:00 PM

नवी दिल्ली : एका कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल(Viral video) झाला आहे. मेट्रो ट्रेनमध्येच(Delhi Metro ) या जोडप्याचे भांडण सुरू झाले. या दोघांमध्ये काहीतरी बाचाबाची होते. मग, काय चिडलेली गर्लफ्रेंड थेट बॉयफ्रेंडला मारायला सुरुवात करते. ट्रेनमध्ये असलेले इतर प्रवासी यांचे भांडण पाहून त्यांच्याकडे पाहतच राहिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. मात्र, कोणीही यांचं भांडण सोडवण्यासाठी पुढे आलं नाही. कुणीतरी गुपचूप यांच्या या भांडणाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडिओ दिल्ली मेट्रोतील

हा व्हायरल व्हिडिओ दिल्ली मेट्रोतील आहे. हे कपल मेट्रोतून प्रवास करत होते यावेळी बोलता बोलता या दोघांमध्ये अचानक भांडण झाले. यानंतर गर्लफ्रेंडच्या रागाचा पारा चढला. मग काय रागाच्या भरात पोरीने पोराला डायरेक्ट मारायलाच सुरुवात केली.

टी-शर्ट वरु झालं भांडण

या दोघांमध्ये सुरू असलेल्या संवादावरून यांच्यात एका टी-शर्ट वरुन भांडण झाल्याचे समजत आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणीने एक नवीन टी-शर्ट खरेदी केले होते. ती तिच्या बॉयफ्रेंडला हे टी-शर्ट हजार रुपये असल्याचे सांगते. मात्र, हे टी-शर्ट साधं दीडशे रुपये देखील नाही असं म्हणत बॉयफ्रेंड तिची खिल्ली उडवतो.

हजार रुपयाच्या टी-शर्ट ला दीडशे रुपये म्हटल्याने गर्लफ्रेंड चिडली

हजार रुपयाच्या टी-शर्ट ला दीडशे रुपयाचे टी शर्ट म्हंटल्याने गर्लफ्रेंडला खूपच राग येतो. चिडून ती बॉयफ्रेंडला मारायला सुरुवात करते. टी-शर्ट एका पिशवीत कोंबत ती आधी बॉयफ्रेंडच्या पाटील एक दोन बुके मारते. तरीही तिचं बॉयफ्रेंड काहीतरी बोलतच राहतो मग काय या बाईला आणखीनच राग येतो. रागाच्या भरात ती बॉयफ्रेंडच्या थडाथड थोबाडीत मारते.

कुणीतरी गूपचूप व्हिडिओ रोकॉर्ड केला

कुणीतरी गूपचूप यांचा व्हिडिओ रोकॉर्ड केला. त्यांच भांडण सुरू असताना त्यांना जिथे उतरायचं आहे ते स्टेशन येते आणि मग दोघेही ट्रेन मधून खाली उतरतात. या कपलच्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. यावर अनेक मजेशीर कमेंट देखील येत आहेत मेट्रो ट्रेनमध्ये मस्त मनोरंजन झालं अशी कमेंट एका युजरने केली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.