Viral Video of Father-Son : वडिल-मुलाचा अनोखा खेळ, तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही
तुम्ही सोशल मीडिया(Social Media)वर अनेक गंमतीदार व्हिडिओ (Funny Videos) पाहिले असतील. आज आम्ही तुम्हाला पिता-पुत्राच्या नात्याचा एक अप्रतिम व्हिडिओ दाखवणार आहोत.
![Viral Video of Father-Son : वडिल-मुलाचा अनोखा खेळ, तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही Viral Video of Father-Son : वडिल-मुलाचा अनोखा खेळ, तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/01/16184241/game.jpg?w=1280)
तुम्ही सोशल मीडिया(Social Media)वर अनेक गंमतीदार व्हिडिओ (Funny Videos) पाहिले असतील. आज आम्ही तुम्हाला पिता-पुत्राच्या नात्याचा एक अप्रतिम व्हिडिओ दाखवणार आहोत. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांना आवडलाय. या व्हिडिओमध्ये पिता-पुत्राची केमिस्ट्री लोकांना खूप आवडलीय.
पैज लावतात
मुलगा वडिलांसोबत गेम खेळताना दिसतोय. यामध्ये मुलगा विजय-पराजयावर वडिलांकडून पाच हजार रुपयांची पैज लावतो. यानंतर काय होते ते पाहून तुम्हालाही हसू फुटेल. व्हिडिओमध्ये दिसतंय, की मुलगा वडिलांसोबत पैज लावतो, की जर त्यानं वडिलांकडून 24 म्हणवून घेतलं तर तो गेम जिंकेल आणि त्याला खेळाचे पाच हजार रुपये मिळतील.
काही प्रश्नांची उत्तरं चूक
दुसरीकडे, खेळ संपेपर्यंत वडिलांनी 24 नाही म्हटलं, तर वडील गेम जिंकतील आणि पाच हजार रुपयेही. यानंतर, गेममध्ये काय होतं ते पाहताना तुम्हाला मजा येईल. मग खेळ सुरू होतो आणि मुलगा वडिलांना अनेक प्रश्न विचारतो. मुलगा जे प्रश्न विचारतो, त्यातील काही प्रश्नांची उत्तरे 24 आहेत. काही प्रश्नांची उत्तर वडील चुकीची देतात.
View this post on Instagram
शेवटी हशा
शेवटी, वडील एका प्रश्नाचं 19 उत्तर देतात, त्यानंतर मुलगा त्यांना म्हणतो, की तुम्ही 19 बोललात. वडिल मुलाच्या जाळ्यात अडकतात आणि आपल्या मुलाकडून खेळ हरतात. शेवटी दोघांचा हशा बघायला मिळतो. हा व्हिडिओ पाहून लोक मजेशीर कमेंट करत आहेत.