भांडणही हवं तर असं..! Viral होतोय ‘हा’ Frog Dog funny video; यूझर्स म्हणतायत, असा आत्मविश्वास हवा!

Animal funny video : एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये बेडूक (Frog) कुत्र्याशी (Dog) भांडताना दिसत आहे. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये बेडूक कुत्र्याला तोंडाने पकडतो आणि त्याच्याशी लढतो.

भांडणही हवं तर असं..! Viral होतोय 'हा' Frog Dog funny video; यूझर्स म्हणतायत, असा आत्मविश्वास हवा!
कुत्रा आणि बेडकाची झुंज
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 2:15 PM

Animal funny video : इंटरनेटचे विश्व मजेदार व्हिडिओंनी भरलेले आहे. कधी कधी असे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले जातात जे येताच तुफान व्हायरल होतात. काही व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटते तर काही व्हिडिओंनी हसायला येते. असे व्हिडिओ पाहणे आपण खूप एन्जॉय करत असतो. प्राण्यांचे व्हिडिओ हे याच प्रकारामध्ये येतात. जंगली प्राण्यांचे व्हिडिओ आपल्याला घाबरवत असले तरी पाळीव आणि इतर छोटे मोठे प्राणी मात्र आपले मनोरंजन करतात. आजकाल असाच एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये बेडूक (Frog) कुत्र्याशी (Dog) भांडताना दिसत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हीही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की कुत्रा बेडकावर भुंकतो आहे. त्याचा बेडूक न घाबरता सामना करत आहे आणि कुत्र्यावर धाडसाने हल्ला करत आहे. तो उडी मारून कुत्र्यावर हल्ला करताना दिसत आहे. इतका की बेडूक कुत्र्याला तोंडाने पकडतो आणि त्याच्याशी लढतो.

ट्विटरवर शेअर

बेडकाच्या या शौर्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही 14 सेकंदांची क्लिप IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी मंगळवारी ट्विटरवर शेअर केली. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, की कुत्र्याला बेडूक त्रास देत आहे. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला 40 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच लोक या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘मुझे बस इतने आत्मविश्वास की जरूरत है’

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही क्लिप पाहिल्यानंतर अनेक यूझर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, ‘मला वाटते की ते भांडत नाहीत, ते आपापसात खेळत आहेत.’ तर दुसर्‍या यूझरने लिहिले, ‘मुझे बस इतने आत्मविश्वास की जरूरत है.’ याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर आपले मत व्यक्त केले आहे.

आणखी वाचा :

Video : Beautiful Look असलेला ‘हा’ पाहा जंगलातला अनोखा प्राणी, वेधून घेत आहे सर्वांचं लक्ष

Viral : ‘हा’ प्राणी नेमका आहे तरी कसा? Photo पाहून विचाराच पडले यूझर्स

Eagle Attack Fox : Video पाहून यूझर्स म्हणतायत, पुतीन यांच्याबाबतीतही असंच होणार!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.