तरुणीचं धाडस! सापाला उचलून रस्त्याच्या कडेला सोडलं, Video viral

Snake video : व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. एका मुलीने साप पकडून ठेवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्या धाडसाने त्या मुलीने सापाला रस्त्यावरून उचलून बाजूला ठेवले.

तरुणीचं धाडस! सापाला उचलून रस्त्याच्या कडेला सोडलं, Video viral
सापाला पकडून रस्त्याच्या कडेला सोडते तरुणीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 12:37 PM

Snake video : साप दिसायला भीतीदायक असतात तसेच धोकादायकही… त्यांना पकडणे हे काही लहान मुलांचे काम नाही. हे अत्यंत धोकादायक काम आहे, कारण विषारी साप पकडताना अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. पण हल्ली एका मुलीने साप पकडून ठेवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्या धाडसाने त्या मुलीने सापाला रस्त्यावरून उचलून बाजूला ठेवले, ते खरोखरच थक्क करणारे आहे. हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. हा व्हिडिओ ब्राझीलचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध एक साप बसलेला दिसत आहे. त्याचवेळी दुचाकीवरून उतरल्यानंतर एक व्यक्ती त्याच्याकडे पाहत आहे, मात्र सापाला तिथून बाजूला करण्याचे धाडस त्याच्यामध्ये नाही.

घाबरत नाही

हे सर्व सुरू असताना एक मुलगी तिथे येते आणि काही क्षण सापाकडे पाहून हाताने उचलून रस्त्याच्या कडेला ठेवते. हे दृश्य खरोखरच आश्चर्यकारक आहे, कारण साप पकडताना, मुलगी अजिबात घाबरत नाही आणि अगदी निर्धास्तपणे ती त्याला बाजूला ठेवते. दिसते. हा व्हिडिओ पाहा…

View this post on Instagram

A post shared by UNILAD (@unilad)

इन्स्टाग्रामवर शेअर

तरुणीचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर unilad नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की हा साप ब्राझीलच्या जाबोटीकटूबासमध्ये रस्त्यावर दिसला. त्याला ट्रॅफिकमुळे इजा झाली नाही. जॅकली नावाच्या महिलेने त्याला रस्त्याच्या कडेला ठेवला. त्यासोबत असे लिहिले आहे, की तुमच्या घरी किंवा आजूबाजूला असे काही असल्यास स्वत: जवळ जाऊ नका. सर्पमित्राशी संपर्क करा.

आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ

एका दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 78 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरने कमेंट करत लिहिले, की मला आश्चर्य वाटते, की ही मुलगी सापांना अजिबात घाबरत नव्हती. हिच्याप्रमाणे आपणही निर्भय बनावे. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरने कमेंट करताना लिहिले, की ही रिअल लाइफ वंडर वुमन आहे. एकूणच या व्हिडिओने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.

आणखी वाचा :

#earthquake : शक्तीशाली धक्क्यांनी हादरला Japan; आता Tsunamiचा इशारा, पाहा Viral video

#tribal : Gondiची गोडी..! पारंपरिक वेशभूषेसह शिक्षक करताहेत संस्कृती आणि भाषेचं रक्षण, Video viral

कुत्र्यांच्या पिल्लांचं जबरदस्त Skipping याआधी कधीही पाहिलं नसेल, Video viral

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.