Viral : ‘हे’ अप्रतिमच आहे! बॅकफ्लिप्स मारून हत्तीच्या अंगावर जाणं सोपं नाही, पाहा Stunt video

Amazing stunt : काही लोक परफेक्ट स्टंट करतात. एका स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. व्हायरल (Viral) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस हत्तीवर (Elephant) चढून अप्रतिम स्टंट करताना दिसत आहे.

Viral : 'हे' अप्रतिमच आहे! बॅकफ्लिप्स मारून हत्तीच्या अंगावर जाणं सोपं नाही, पाहा Stunt video
अप्रतिम स्टंट करून हत्तीच्या अंगावर जाताना स्टंटमनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 12:39 PM

Amazing stunt : आजकाल लोकांच्या डोक्यावर स्टंटचे भूत इतके बसले आहे, की विविध आणि धोकादायक स्टंट्स करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. तुम्ही सोशल मीडियावर (Social media) स्टंटशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये अनेक लोक चालत्या बाइकवर स्टंट करताना दिसतात, तर अनेकजण सायकल चालवून आपले कौशल्य दाखवतात. ‘मौत का कुआं’मध्ये लोक ज्या पद्धतीने स्टंट करतात, त्याचप्रमाणे आता लोक रस्त्यावरही स्टंट करताना दिसतात. अनेकांना स्टंटबाजीची एवढी हौस असते, की उंच आणि धोकादायक टेकड्यांवर उभे राहूनही ते असे स्टंट करतात, की ते पाहून हसू येईल. तर काही लोक परफेक्ट स्टंट करतात. अशाच एका स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. व्हायरल (Viral) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस हत्तीवर (Elephant) चढून अप्रतिम स्टंट करताना दिसत आहे.

हवेत बॅकफ्लिप

तुम्ही अनेकांना बॅकफ्लिप्स करताना पाहिले असेल, पण हत्तीवर कुणाला बॅकफ्लिप करताना पाहिले आहे का? नक्कीच पाहिले नसेल, पण असाच काहीसा प्रकार व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महाकाय हत्ती समोर थोडासा झुकलेला आहे आणि एक माणूस धावत येतो आणि त्याच्यावर उडी मारून स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये हत्तीनेही त्याला खूप साथ दिली आणि त्या व्यक्तीने हवेत 2-3 बॅकफ्लिप मारले आणि त्यानंतर हत्तीच्या अंगावर आला. त्याचे संतुलन आश्चर्यकारक आहे. तो बॅकफ्लिप इतक्या अचूकपणे मारतो की तो थेट हत्तीवर उतरतो.

इन्स्टाग्रामवर शेअर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर elephant.lover.lover या आयडीसह हा आश्चर्यकारक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 7 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर हजारो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा :

अशी काही लाथ मारली, की पुन्हा बैलाच्या नादी लागायचा नाही ‘हा’ बैल! Video viral

Video : मुलगा देवपूजेला करतो टाळाटाळ… मग काय घडतं? वनिताताईं पाटील यांनी सांगितली मजेशीर कथा; Kirtan viral

तुम्ही खाद्यपदार्थ वाया तर घालवत नाही ना? ‘हा’ Viral video पाहा, काय दिला संदेश?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.