नवी दिल्ली : फॅशन (fashion) ही अशी गोष्ट आहे ज्याला कोणतीही सीमा नाही. स्त्रिया अनेक वर्षांपासून फॅशन म्हणून मुलांचे कपडे घालत आहेत, मग आता पुरुष कुठे मागे राहणार आहेत ? त्यांनीही ‘फक्त महिलांसाठी’ (for women) हा टॅग काढून टाकण्याची तयारी सुरू केली आहे. सर्व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी मेकअपसह साड्या नेसण्यास आणि स्कर्ट घालण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे दिल्ली मेट्रोमध्ये दोन लोक स्कर्ट (2 men wore skirt in Delhi metro) घालून प्रवास करताना दिसले.
लोकांच्या कपड्यांमुळे आणि डान्समुळे दिल्ली मेट्रो काही काळापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच एका तरूणीने बिकनी घालून मेट्रोतून प्रवास केला होता. तर आता दोन मुलांनी मेट्रोत स्कर्ट घालून प्रवास केल्याने पुन्हा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
इन्स्टाग्रामवर समीर खान नावाच्या एका तरूणाने त्याच्या अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओत तो आपल्या मित्रासोबत स्कर्ट घालून दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी गेल्याचे दिसत आहे. या प्रवासादरम्यान लोक त्यांच्याकडे आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिले. आतापर्यंत 78 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तसेच यावर लोक खूप कमेंट करत आहेत. त्याच्या आत्मविश्वासाचे कौतुक करताना लोकं थकत नाहीयेत. एवढेच नव्हे तर स्कर्ट आणि पॅन्ट मुलांसाठीही नॉर्मल कराव्यात असेही काही युजर्स म्हणत आहे.
स्कर्ट घातलेल्या या मुलांचा बचाव करताना एका मुलीने लिहिले, ‘लुंगी तक को ठीक था लेकिन स्कर्ट नहीं? मला अजून समजले नाही, दोन्ही सारखेच आहेत. मात्र काही लोकांना हा प्रकार फारसा आवडलेला दिसत नाहीये. एका युजरने म्हटले की, ‘तुझ्यासारख्या लोकांमुळे मुलांमध्ये मर्दानी गुण संपले आहेत.’ दुसरा वापरकर्ता म्हणाला, ‘भावा, अरे तू बांगड्याही घातल्या असत्या. तू सिंदूर लावला नाहीस, त्यामुळे तुझे लग्न झालेले नसावे हे मी समजू शकतो.
दरम्यान, सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती बिकिनी घालून दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत होती. या मुलीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यात तिने वेगवेगळ्या रंगांची बिकिनी घातली होती.