डोंगराळ रस्त्यावर अडकला ट्रक, पुढे काय होतं? Video सोशल मीडियावर Viral
डोंगराळ रस्त्यांवर गाडी चालवणं (Driving in Hilly Roads) हा काही लहान मुलांचा केळ नाही. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. त्यात एक ट्रक (Truck) रस्त्यात अशाप्रकारे अडकलाय, की बघणाऱ्यांचा श्वास क्षणभर रोखला जाईल.
Accident Shocking Video : डोंगराळ रस्त्यांवर गाडी चालवणं (Driving in Hilly Roads) हा काही लहान मुलांचा केळ नाही. अशा रस्त्यांवरून गाडी चालवायला खूप कौशल्य आणि अनुभव लागतो. विशेषत: मोठी वाहनं (बस आणि ट्रक) मोठ्या जबाबदारीनं चालवावी लागतात, कारण एकदा का ती डोंगराळ रस्त्यांवर अडकली की रस्ता जाम होतोच पण त्याचवेळी असे अपघातही होतात, जे पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. त्यात एक ट्रक (Truck) रस्त्यात अशाप्रकारे अडकलाय, की बघणाऱ्यांचा श्वास क्षणभर रोखला जाईल.
ट्रक अडकला
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक ट्रक अतिशय अरुंद रस्त्यावर अडकलाय. पुढे बांधकाम सुरू असल्यानं ट्रक तिथेच थांबवावा लागला. पण त्यानंतर जे घडलं ते खरोखरच भयानक होतं कारण ट्रक पुढे किंवा मागे जाऊ शकत नव्हता. एवढा जड ट्रक खड्ड्यात पडू नये, असंच आपल्याला वाटेल. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला एक ट्रक ड्रायव्हर किती अडचणीत सापडला असेल, याची स्पष्ट कल्पना येऊ शकते.
गाडी चालवताना काळजी घ्यायलाच हवी!
या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. लोक कमेंट करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरनं लिहिलंय, की या ट्रक ड्रायव्हरमध्ये खरंच खूप हिंमत आहे कारण बघणाऱ्यांनाच एवढी भीती वाटत असेल, तर ड्रायव्हरची अवस्था कशी असेल याची कल्पना करा. तर दुसऱ्या यूझरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलंय, की अशा रस्त्यांवरून गाडी चालताना काळजी घ्यावी. कारण एक छोटीशी चूक तुमचा जीव घेऊ शकते! याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्या कमेंट्स नोंदवल्या आहेत.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर शेअर
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर memewalanews नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, की आता काय होईल?’ ही बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला शेकडो लाइक्स आणि व्ह्यूजही मिळाले आहेत.