VIDEO | लाईव्ह शोमध्ये Private Part ला हात लावण्याचा प्रयत्न, चहाटळ प्रेक्षकाला गायिकेकडून जन्माची अद्दल
व्हेरोनिका लुग्या हिने प्रेक्षकाला ज्या हुशारीने धडा शिकवला, त्याची वाहवा सोशल मीडियावर होत आहे (singer Veronica Luggya kicks fan )
जुबा (दक्षिण सुदान) : सेलिब्रिटींच्या लाईव्ह शोला हजेरी लावणाऱ्या प्रेक्षकांमध्ये काही टवाळखोरही लपलेले असतात. आसपास बसलेल्या महिला प्रेक्षकांसोबत अश्लील वर्तन असो किंवा अश्लाघ्य हातवारे असोत. दक्षिण सुदानमधील (South Sudan) एका प्रेक्षकाची मजल तर थेट लाईव्ह परफॉर्मन्स देणाऱ्या गायिकेसोबत असभ्य वर्तन करण्यापर्यंत गेली. तिच्या लैंगिक अवयवांना हात घालण्याचा प्रयत्न त्याने भर कार्यक्रमात केला. मात्र शूर गायिकेनेही त्याला भर सभागृहात जन्माची अद्दल घडवली. (Viral Video of Ugandan singer Veronica Luggya who kicks fan who tried touch her private parts during live performance)
लाईव्ह परफॉर्मन्समध्येच छेडछाड
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहे. दक्षिण सुदानची राजधानी जुबा (Juba) शहरात युगांडा देशातील प्रसिद्ध गायिका व्हेरोनिका लुग्या (Veronica Luggya) हिचा लाईव्ह परफॉर्मन्स होता. यावेळी तिला छेडछाडीचा सामना करावा लागला. व्हेरोनिका गात असतानाच एका व्यक्तीने तिच्या प्रायव्हेट पार्ट्सना हात लावण्याचा प्रयत्न केला.
व्हेरोनिका लुग्या हिने प्रेक्षकाला ज्या हुशारीने धडा शिकवला, त्याची वाहवा सोशल मीडियावर होत आहे. हा चहाटळ प्रेक्षक स्वप्नातही कुठल्या महिलेसोबत अश्लील वर्तन करण्याचा विचार करणार नाही. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये व्हेरोनिका उर्फ चाहत्यांची लाडकी विंका (Vinka) त्याला आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा धडा देताना दिसते.
काय केलं व्हेरोनिकाने?
व्हिडीओमध्ये दिसते, की एका प्रेक्षकाने व्हेरोनिका लुग्या हिच्या प्रायव्हेट पार्ट्सना हात लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर व्हेरोनिकाने त्याला एकामागून एक दोन वेळा लाथा मारल्या. भर सभागृहात गायिकेच्या लाथा खाऊन टवाळखोर नक्कीच शरमला असेल. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी धाव घेतली आणि त्याला उचलून नेले.
सोशल मीडियावर वाहव्वा
हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी व्हेरोनिका लुग्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिने दाखवलेल्या समयसूचकता आणि प्रसंगावधानाची स्तुती केली जात आहे. दोन दिवसांतच या व्हिडीओला ट्विटरवर 38 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 14 हजारांहून जास्त युजर्सनी तो रिट्वीट केला आहे. तर हजारोंच्या संख्येने कमेंट्सही आल्या आहेत. (singer Veronica Luggya kicks fan )
पाहा व्हिडीओ :
Ugandan singer @IamVinka appears to kick out at a fan who tried to touch her private parts during a performance in South Sudan pic.twitter.com/1hDItscIqy
— MBU (@MBU) May 15, 2021
संबंधित बातम्या :
VIDEO : तरुणाच्या जीवघेण्या स्टंटची जोरदार चर्चा, काळजाचा ठोका चुकवणारा व्हायरल व्हिडीओ
Video | महिलेला ‘पोल डान्स’ची भारीच हौस, मध्येच ‘असं’ घडलं की व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ
(Viral Video of Ugandan singer Veronica Luggya who kicks fan who tried touch her private parts during live performance)