Video : एक चूक आणि बघता बघता 60 लाखाच्या वाईन्सच्या बाटल्यांचा पूर वाहायला लागला, बघा व्हीडिओ…
हा व्हीडिओ RT.com या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला दहा हजारहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर काहींनी लाईक केलंय. काहींनी रिट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : दारू (wine) अनेकांचा विक पॉईंट… आनंद झाला प्या दारू, दुख: झालं प्या दारू असं आनंद आणि दु:खाच्या प्रसंगी सोबत असणारी दारू अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. पण हीच दारू स्वत:च्या डोळ्यासमोर पाण्यासारखी वाहताना दिसली तर? असं घडलं आहे. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होत आहे. यात लाखो रूपयांची दारू वाया गेल्याचं दिसत आहे. या व्हीडिओला हजारो व्हूज मिळाले आहे. अन् असा भन्नाट व्हीडिओ पाहायला मिळाल्यावर नेटकरीही व्यक्त झालेत. त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
व्हायरल व्हीडिओ
ट्विटरवर एका व्हीडिओची सध्या चांगलीच चर्चा आहे. यात बऱ्याच दारूच्या बाटल्या दिसतआहेत. एक व्यक्ती त्यातली एक दारूची बाटली काढतो. अन् परत तो आहे तिथे ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण इतक्यात डाव मोडतो अन् एक-एक करून दारूट्या बाटल्या पडू लागतात. पडलेल्या बाटल्यांमधून दारू वाहू लागते. हे पाहून मग एकजण त्याच्या मदतीला धावून येतो. तो ह्या पडणाऱ्या बाटल्या रोखण्याचा प्रयत्न करतो. पण काहीही उपयोग होत नाही मग तर सगळ्याच बाटल्या पडतात. त्यामुळे साठ लाखांची दारू वाया गेली आहे.
Wine cellar collapses causing 6MN rubles damage, #Russia pic.twitter.com/FzguLmMgn8
— RT (@RT_com) April 26, 2022
हा व्हीडिओ RT.com या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला दहा हजारहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर काहींनी लाईक केलंय. काहींनी रिट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी म्हटलंय. एवढी दारू वाया गेली. तर एकजण म्हणतो की, एज चूक महागात पडली.
याच ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यात दोन उंटांच्या मध्ये एक महिला बसलेली दिसत आहे. तिच्या हातात एक लॅपटॉपही पाहायला मिळतोय. हा फोटो अनेकांच्या पसंतीला उतरतोय.
EU wants to tap India’s tech potential
‘Be friends with us, not with Russia’ strategy?
Read: https://t.co/AZKOA7kCd4 pic.twitter.com/l77RdI72Vh
— RT (@RT_com) April 26, 2022