Viral Video : काळजाचा थरकाप उडविणारी घटना, महिला इमारतीवरुन उडी मारणार होती, परंत तेवढ्यात ते आले आणि…
एक महिला सज्ज्यात विमनस्क अवस्थेत उभी आहे. ती इमारतीवरुन कोणत्याही क्षणी उडी मारणार ? असा भयानक कसोटीचा क्षण... तेवढ्यात एक चमत्कार होतो..
दिल्ली : सोशल मिडीयावर ( Social Media ) व्हायरल होणारे काही व्हिडीओ ( Viral Video ) एकदम चित्तथरारक असतात. त्यातील काही व्हिडीओ मनोरंजन करणारे असतात, तर काही व्हिडीओ पाहिल्यावर आपल्याला ते विचार करायला लावतात. ट्वीटरवर ( Twitter ) आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहून तुम्हाच्या काळजाचा थरकाप होईल. या व्हिडीओत तुम्ही एका महिलेला तिच्या इमारतीच्या गॅलरीतून उतरुन उडी मारण्याचा प्रयत्न करीत आहे. तिला वाचविण्यासाठी तिचे मन वळविण्यासाठी क्षणाचाही वेळ नाहीए…अन चित्रपटातील स्टंट सीन वाटावा असा एक चमत्कार घडतो आणि टाळ्यांचा कडकडाट होतो.
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला इमारतीच्या गॅलरीत उतरून एक महिला सज्ज्यात विमनस्क अवस्थेत उभी आहे. ती कोणत्याही क्षणी उडी मारणार ? अशा भयानक कसोटीचा क्षण आहे, तेवढ्यात एक चमत्कार होतो, इमारतीच्या वरुन सुपरहिरो स्पायडर प्रमाणे चित्त्याच्या चपळाईने येतात आणि त्या महिलेला कसे वाचवितात हे पाहताना अंगावर काटे येतात. त्यामुळे बचाव पथकाच्या या जवानांच्या प्रसंगावधानाने ही महिला अगदी आश्चर्यकाकरित्या बचावली जाते. आणि हा क्षण पाहणारे टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांचे आभार मानतात.
येथे पाहा व्हिडीओ..
They risk their lives to keep us safe pic.twitter.com/tkL779bdlX
— Next Level Skills (@NextSkillslevel) June 18, 2023
हे जवान म्हणजे पडद्यावर स्पेशल इफेक्ट किंवा डमी वापरुन हा प्रकार करीत नाहीत. तर ते तुमच्या आमच्या सारखे हाडामासाचे असून त्यांच्या बहादूरीला हा व्हिडीओ पाहून तुम्ही त्यांना सलाम कराल. सोशल मिडीयावर NextSkillslevel नावाच्या ट्वीटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला 16 लाख लोकांनी पाहिले आहे. या व्हिडीओला 24 हजार लोकांनी त्याला लाइक्स केले आहे. या व्हिडीओला कमेंटही करण्यात आल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की सलाम या जवानांच्या बहादूरीला ! एका युजरने म्हटले आहे हा व्हिडीओ शानदार आहे.