मेटल डिटेक्टरमधून आला ‘बिप..बिप’चा आवाज, त्याने तोडला दगड आणि मिळाला करोडोंचा खजाना
व्हिडीओ दिसणाऱ्या याव्यक्तीच्या हातातील मेटेल डिटेक्टरमधून बिप-बिप असा आवाज येताच लगेच डोंगरातील तो खडक तोडण्यास सुरुवात करते. बराच वेळ दगड फोडल्यानंतर, त्या माणसाच्या कष्टाचे चीज होते. त्याला दगडाखाली गाडलेला एक खजाना गवसतो....

कोणाचे नशीब कधी फळफळाला येईल हे सांगू शकत नाही. तर एखादा रावाचा रंक कधी होईल जमीनीत गाडला जाईल हेही सांगू शकत नाही. भगवान देता है तो छप्पर फाडके असे अनेकदा सिद्ध होते. त्यामुळे एखादे सहज काढलेले लॉटरीची तिकीट एखाद्याला करोडपती करुन जाते.सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखविणार आहोत. या व्हिडीओत एक इसम डोंगरात खजाना शोधताना दिसत आहे.त्याच्या हातात मेटेल डिटेक्टर देखील दिसत आहे….
येथे पाहा पोस्ट –




View this post on Instagram
सोशल मीडियावरील या व्हिडीओत दिसणाऱ्या एका इसमाला खूप शोधकार्य केल्यानंतर मेटल डिटेक्टर मशीनमधून बिप-बिप असा आवाज येतो. त्यानंतर तो जेथून आवाज येतो तेथे दगड फोडायला लागतो. त्यानंतर दगडाच्या अनेक स्तर तोडल्यानंतर पुन्हा तो मेटल डिटेक्टर मशीन जवळ नेतो तर पुन्हा बिप – बिप असा आवाज मोठ्याने येतो. नंतर आणखीन दगड तोडल्यानंतर त्याला एक छोटी धातूची पेटी सापडते. तो पेटी तो उघडतो तर आत जुन्याकाळातील सुवर्ण मुद्रा लपवलेल्या त्याला मिळतात. ही जुणी सोन्याच्या नाणी कोट्यवधी रुपयाची आहेत. इंस्टाग्रामवर या व्हिडीओला @_.archaeologist या खात्यावरुन शेअर केलेले आहे. परंतू हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहीती मिळालेली नाही.
आम्ही जेव्हा हे अकाऊंट चेक केले तर तेथे खजाना सापडल्याचे अनेक व्हिडीओ शेअर केलेले आढळले. ज्यास लाखो लोकांनी पाहीलेले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ खरा आहे खोटा याचा दुजोरा आम्ही देऊ शकत नाही. हे व्हिडीओ इंस्टाग्रामवर खूपच व्हायरल होत असतात. परंतू त्यातील सत्यता कितपत आहे हे कळलेले नाही.