बाळासाठी दूध घ्यायला स्टेशनवर उतरली आई, तितक्यात सुरु झाली ट्रेन गार्डने केलेल्या कामाचे कराल कौतुक
women viral video: व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका महिलेची ट्रेन सुटल्याने ती रडताना दिसत आहे. तर त्यावेळी एका रेल्वे गार्डने त्या महिलेला रडताना पाहून गार्ड मदत करतो आणि समोरचे दृश्य पाहून तुम्हीही खूश व्हाल आणि गार्डचे नक्कीच कौतुक कराल. त्यात हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर सतत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी असे काही व्हिडीओ असतात जे पाहून अनेकजण खूप भावुक होतात. असाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या लहान बाळासाठी दूध आणण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरली. पण दूध खरेदी करून परत येताना ट्रेन सुरु झाली. आता अशा परिस्थितीत एखादी आई घाबरून जाणे साहजिक आहे.
या व्हिडिओमध्ये पहिले तर, महिला वेड्यासारखी धावत्या ट्रेनचा पाठलाग करून धावू लागली. पण ट्रेन सुरु झाल्याने ट्रेनच्या वेगापुढे महिलेला ट्रेन पकडताच आली नाही. त्यानंतर महिला रेल्वे रुळावर उभी राहून रडत असल्याचे दिसत आहे. आपल्या मुलासाठी दूध आणण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरली होती, पण त्यातच ट्रेन अचानक सुरु झाल्याने महिला घाबरली आणि तिचे डोळे आपोआप पाणावले. आपल्या बाळाच्या विचाराने ती घाबरली.
ट्रेन सुरु झाल्यानंतर ती महिला खाली रुळावर व्यथित होऊन उभी राहली. महिलेच्या डोळ्यात पाणी आले. आता आपली गाडी चुकली, आपल्या बाळाचे काय होणार या विचाराने ती महिला त्रस्त झाल्याचे दिसते. पण तितक्यात एक चमत्कार घडतो आणि अचानक ट्रेन थांबते. ट्रेन थांबताच महिला वेगाने ट्रेनच्या दिशेने धाव घेते आणि ट्रेन मध्ये चढते. शेवटी आई- बाळाची भेट होते. दरम्यान हा चमत्कार घडला कसा? जाणून घेण्यासाठी पाहूया हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ.
एक माँ दूध लेने गई, तभी ट्रेन चल पड़ी। गार्ड ने देखा और तभी ट्रेन रुकवाई…. pic.twitter.com/Lf2gZKNN3f
— Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) January 8, 2025
हा व्हिडिओ @Sheetal2242 या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात तर महिला ट्रॅकवर उभी राहून अक्षरशः धायमोकलूं रडत आहे. कारण तिचं बाळ ट्रेनमध्येच राहिलं. पण तेवढ्यात गार्डनं प्रसंगावधान दाखवून ट्रेनच्या मोटरमनशी संपर्क साधला. आणि त्यांना सद्य परिस्थिती सांगून ट्रेन थांबवण्याची विनंती केली. परिणामी आई आणि बाळाची पुन्हा एकदा भेट झाली.
हा व्हिडीओ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनीपहिला असून त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. कोणी त्या गार्डचं आणि मोटरमनचं कौतुक करतेय. म्हणताहेत, देवासारखे मदतीला धावून आले.तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे – गार्डने केलेली मदत हृदय पिळवटून टाकणारी आहे. तिसऱ्या युजरने लिहिलं आहे – माणुसकी अजूनही जिवंत आहे, तर या गार्डने आणखीन एक उदाहरण बनवलं आहे, तुम्हाला सलाम. इतर अनेक युजर्सनी कमेंट करत गार्डचं कौतुक केलं आहे. असो, हा व्हिडीओ पाहून तुमचं मत काय आहे? तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया द्या.