निर्लज्जपणाचा कळस…! भर लग्नात नवरी बिकिनीवर आली; अवतार पाहून वऱ्हाडी…

लग्नात बिकिनी घातलेल्या नवरीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो खरा आहे की एआयने तयार केलेला, यावरुन वाद निर्माण झाला आहे. काहींनी नवरीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला आहे तर काहींनी हा फोटो बनावटीचा असल्याचे सांगितले आहे

निर्लज्जपणाचा कळस...! भर लग्नात नवरी बिकिनीवर आली; अवतार पाहून वऱ्हाडी...
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 3:26 PM

लग्न ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे. त्यामुळे लग्नाची प्रत्येकाला उत्सुकता असतेच. आपलं लग्न रॉयल आणि हटके होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. लग्नात वेगवेगळ्या कल्पक गोष्टी केल्या जातात. विवाहाचा सोहळा संस्मरणात राहावा यासाठी हा प्रयत्न असतो. पण काही लोक कधी कधी वेडपटासारखे वागतात. आता एका लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. या लग्नात एक नवरी थेट बिकिनीत आली. त्यामुळे मंडपात एकच खळबळ उडाली. वऱ्हाडाची तर पाचावर धारणच बसली.

या व्हायरल फोटोत नवरी पिवळ्या रंगाची बिकिनी, पारंपरिक लाल बांगड्या, हात आणि पायावर मेहंदी आणि डोक्यावर दुपट्टा घालून दिसते. तर ‘नवरदेव’ शेरवानी घातलेला दिसतो. काही यूजर्सने हा फोटो खरा की खोटा? असा सवाल केला आहे. तर काही लोकांनी नवरीच्या बिकिनी पोशाखाची खिल्ली उडवत संताप व्यक्त केला आहे. काहींनी तर नवरीने लाजच सोडल्याचा संताप व्यक्त केला आहे.

इंटरनेटवर फोटो व्हायरल

हा फोटो व्हायरल झाल्यावर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेl. कुणाच्या कपड्यांवर, पोषाखावर टीका करणं योग्य नाही, असं काही लोकांनी म्हटलं आहे. कदाचित चुकीच्या संदर्भाने हा फोटो व्हायरल केला गेला असेल किंवा चुकीच्या ठिकाणी हा फोटो जोडला गेला असेल. लग्नातील हा फोटो नसावा असं काहींचं म्हणणं आहे. लखनऊच्या नवरीने लग्न समारंभात बनारसी बिकिनी घालून स्टीरियोटाइप तोडला, असं टायटल देऊन एकाने पोस्ट केली आहे. या फोटोमुळे सोशल मीडियात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून त्यावरून दोन गट पडले आहेत. हा फोटो एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) द्वारे तयार करण्यात आल्याचं समोर येत आहे.

लोक काय म्हणाले?

या फोटोवर हजारो लोक कमेंट करत आहेत. काहींनी याला “संस्कृतीचे पतन” म्हटले, तर काहींनी याला “निलाजरेपणाची हद्द” म्हणून टीका केली आहे. एक यूजर म्हणाला, “हे लग्न नाही, तर निलाजरेपणाचं प्रदर्शन आहे.” तर दुसऱ्या युजरने खोचक टिप्पणी केली, “आता लग्नात हे सगळं पाहावं लागणार का? मी अंधळा आहे हेच बरं आहे.”

या फोटोवर अनेक लोक तावातावाने प्रतिक्रिया देत आहेत. लज्जास्पद म्हणून या प्रकाराचा निषेध नोंदवला जात आहे. मात्र, या फोटोच्या प्रामाणिकतेबद्दल अद्याप काही ठोस माहिती मिळालेली नाही आणि ते कुठल्या ठिकाणचे आहे, याचाही काही ठोस पुरावा नाही. मात्र, एआयद्वारे हा फोटो तयार केला असावा असं सांगितलं जात आहे.

लोकांचा आक्षेप

भारतामध्ये लग्नाला एक खास स्थान आहे, लग्न समारंभ हा संस्कार आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जात आहे. अशा परिस्थितीत नवरीचा असा पोशाख पाहून लोक नाराज झाले आहेत. अनेकांनी हा प्रकार भारतीय परंपरेच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. तर लग्नाच्या पवित्र वेळी असे कपडे घालणे स्वीकारार्ह नाही, अशी प्रतिक्रिया काही लोकांनी नोंदवली आहे.

एआयने तयार केलेलं छायाचित्र

या व्हायरल फोटोला देसी एडल्ट फ्यूजन रेडिट फोरमवर शेअर केले गेले होते. देसी सांस्कृतिक थीमसह एआय-जनरेटेड कला प्रदर्शित करण्यासाठी हा फोरम प्रसिद्ध आहे. 18 नोव्हेंबर 2024 रोजी, या फोटोला अशाच प्रकारच्या इतर एआय-जनरेटेड छायाचित्रांसोबत या सबरेडिटवर शेअर करण्यात आले होते. हा फोटो तयार करण्यासाठी एआयचा वापर केला गेला होता, असं संबंधितांकडून सांगितलं गेलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.