Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | ज्येष्ठ नागरिकाचे जोरदार ठुमके पाहाचं, विरेंद्र सेहवाग म्हणतो ही तर आयपीएलची…

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये होणार आहे. Virender Sehwag share funny dance video

VIDEO | ज्येष्ठ नागरिकाचे जोरदार ठुमके पाहाचं, विरेंद्र सेहवाग म्हणतो ही तर आयपीएलची...
विरेंद्र सेहवागनं एक व्हिडीओ शेअर केला
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 1:09 PM

नवी दिल्ली: आयपीएलचा (IPL 2021) चौदावा हंगाम उद्यापासून सुरु होत आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामातील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये होणार आहे. आयपीएल सुरु होत असल्यानं क्रिकेटप्रेमींच्या आनंदाला उधाण आलेलं आहे. देशभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये आयपीएलची उत्सुकता ताणली गेलीय. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यानं आयपीएलच्या निमित्तानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्ही देखील हसू आवरु शकणार नाही. (Virender Sehwag share funny dance video of elderly man and gave reference to ipl 2021 netizens loved its)

विरेंद्र सेहवागनं शेअर केला व्हिडीओ

विरेंद्र सेहवागनं शेअर केलेला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक ज्येष्ठ नागरीक जोरदार ठुमके लगावताना पाहायला मिळत आहे. या ज्येष्ठ नागरिकाचे ठुमके पाहून सर्वांना आनंद होत आहे. विरेंद्र सेहवागनं हा व्हिडीओ शेअर करत त्याचा संबध आयपीएलशी जोडला आहे. सेहवागनं व्हिडीओला उद्यापासून ते सुरु होत आहे, ज्याची आतुरता होती #IPL, असं कॅप्शन दिलं आहे.

विरेंद्र सेहवागचं ट्विट

यूजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

विरेंद्र सेहवागनं हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. सोशल मीडिया यूजर्सच्या त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. एका व्यक्तीनं आयपीएलची उत्सुकता आणि त्याची उत्कंठा इतकी आहे की त्याची इतर कशाशी तुलना होऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. तर एकानं आयपीएल सुरु होत आहे, आता घरी एकत्र बसून त्याचा आनंद घेणार असं म्हटलं आहे.

सेहवागनं हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ 2 लाखपेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ लोकांना आवडत आहे. आयपीएलची पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये होणार आहे. मुंबईनं आतापर्यंत पाचवेळा आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवलं आहे. ते आयपीएलमधील सहावं विजेतेपद मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील.

संबंधित बातम्या:

VIDEO : कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचा सिद्धांत काढला? : संभाजी भिडे

VIDEO | “दादा मास्क काढा” भाषणादरम्यान चिठ्ठी, अजित पवार म्हणतात, “हा शहाणा मला सांगतोय”

 (Virender Sehwag share funny dance video of elderly man and gave reference to ipl 2021 netizens loved its)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.