मुंबई : प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत.. हजारो किलोमीटरवर राहणाऱ्या प्रेमी जोडप्याने (Loving couple), हे अंतर पार करीत भेट घडवून आणली आहे. टिंडर या सोशल मीडिया साइटवर ओळख झाल्यानंतर ओळखीचे प्रेमात रूपांतर झाल्यावर हे जोडपे नुकतेच एकत्र आले आहे. ‘स्कॉटलंड’ मध्ये (In Scotland) राहणारा तरुण अमेरिकेत राहणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमात पडला. अशा परिस्थितीत, आपल्या प्रेमासाठी आणि पहिल्या भेटीसाठी, या व्यक्तीने तब्बल 7 हजार 563 किलोमीटरचा पल्ला गाठून आपल्या प्रियसीची भेट घेतली. या दोघांची भेट Tinder या डेटिंग अॅपवर (On a dating app) झाली. आता हे जोडपे एकमेकांना भेटण्यासाठी त्यांच्या दुसऱ्या प्रवासाची तयारी करत आहेत. व्हायरल झालेल्या जोडप्याच्या व्हिडिओमध्ये, विमानतळावर एकमेकांना भेटल्यानंतर दोघेही खूप आनंदात दिसत आहेत. पॅडी कॅम्पबेल असे, या स्कॉटिश व्यक्तीचे नाव असून त्याची गर्लफ्रेंड ब्रिजेट केली ही अमेरिकेत राहणारी आहे.
पॅडी आणि ब्रिजेट या दोघांमध्ये ऑनलाइन चॅटिंग सुरू होताच, पॅडीने ठरवले की तो केलीला भेटायला जाणार. म्हणून केलीला भेटण्यासाठी तो विस्कॉन्सिन (यूएसए) येथे आला. दोघांची 4 महिने ऑनलाइन डेटींग सुरु होती. मुलगी ब्रिजेट ने याला पाठींबा देत, टिकटॉकवर ही रोमँटिक स्टोरी शेअर केली आहे. ब्रिजेटने व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, दोघांनी लग्नाला एकत्र कसे हजेरी लावली, डान्स केला, अमेरिकन फूड खाल्ले आणि ब्लूज बँडचा आनंद लुटला. यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी त्याचे अभिनंदन केले असून नेटिजन्स आता या जोडप्याच्या पुढील अपडेटची वाट पाहत आहेत. केलीने असेही सांगितले की पॅडी गेल्या आठवड्यातच त्याच्या घरी (स्कॉटलंड) गेला होता. ती म्हणाली, ‘पुढच्या वेळी मी स्कॉटलंडला जाईन अशी आशा आहे. मी त्याला मिस करत आहे.
पॅडीने यापूर्वी सांगितले होते की, जानेवारी-2022 मध्ये कोविड नंतर त्याच्या जोडीदारा सोबत ब्रेकअप झाले होते. मग तो टिंडरमध्ये सामील झाला. विशेष म्हणजे त्याने यापूर्वी कधीही डेटिंग अॅप वापरले नव्हते.
पॅडी म्हणतो की टिंडरवर येऊन काही महिने उलटले, मग त्याला केलीकडून एक संदेश आला, तो म्हणाला, जेव्हा त्याला वाटले की तो एडिनबर्गचा आहे. पण ती न्यू ग्लारस (विस्कॉन्सिन) येथील होती त्यामुळे आपली भेट होणे कधीही शक्य नाही. परंतु, आपल्या प्रेयसीच्या भेटीसाठी आतुर या प्रेमविराने साडेसातशे किलो मीटरचे अंतर कापून घेतलेली भेट अविस्मरणीय अशीच ठरली.