Video : काळ आला होता, पण.., काही मिनिटं वाचवणं रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला पडलं महागात

Biker escapes a major train accident : काही मिनिटे वाचवण्याचा प्रयत्न मोटारसायकल (Bike) चालवणाऱ्या एका माणसाला महागात पडला. मुंबईत (Mumbai) भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेनखाली (Train) चिरडण्यापासून एक व्यक्ती वाचली आहे.

Video : काळ आला होता, पण.., काही मिनिटं वाचवणं रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला पडलं महागात
रेल्वेरूळ ओलांडताना थोडक्यात बचावली व्यक्ती
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 12:42 PM

Biker escapes a major train accident : काही मिनिटे वाचवण्याचा प्रयत्न मोटारसायकल (Bike) चालवणाऱ्या एका माणसाला महागात पडला. मुंबईत (Mumbai) भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेनखाली (Train) चिरडण्यापासून एक व्यक्ती वाचली आहे. एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर फिरत आहे ज्यामध्ये एक दुचाकी राजधानी एक्स्प्रेस ट्रेनखाली चिरडताना दिसत आहे, तर दुचाकीस्वार दुचाकी सोडून तिथून पळ काढतो. हे व्हिडिओ फुटेज 12 फेब्रुवारी रोजी मुंबईत कॅप्चर करण्यात आले होते. बाइकस्वार रेल्वे रुळांवर थांबताना आणि शेवटच्या क्षणी त्याची मोटरसायकल टाकून देताना दिसत आहे. या घटनेत तोही जखमी झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर ही क्लिप सध्या वेगाने फिरत आहे. अशीच एक घटना घडली होती. मागच्या वर्षीच्या अशाच एका घटनेसह क्लिप जोडण्यात आलीय. त्यामध्ये एक दुचाकीस्वार अशा रेल्वे अपघातातून थोडक्यात बचावला होता.

नियमांचं पालन होत नाही

रेल्वे अपघातांची म्हणजेच रेल्वेखाली येवून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या भारतात मोठी आहे. याचं मुख्य कारण म्हणजे नियमांचं पालन न करणं. खरं तर रेल्वेच्या रुळावर जाणे हा गुन्हा आहे. यासाठी मोठ्या दंडाची तरतूददेखील आहे. रेल्वेतर्फेही अनेकेवेळा सांगण्यात येतं, की रूळ ओलांडू नये. यासाठी पुलांचा वापर करावा. तसंच रेल्वे फाटक नसलेल्या ठिकाणी नागरिकांनी किमान रेल्वे गेल्यानंतर रूळ पार करावा, हे अपेक्षित असतं. मात्र रेल्वे येत असल्याचं दिसत असतानाही अनेकजण आपला जीव धोक्याक घालत असतात.

लागला जोरदार धक्का

अशाच एका घटनेत संबंधित व्यक्ती अगदी थोडक्यात बचावला आहे. रेल्वेचा रूळ तो ओलांडत होता. मात्र त्याची दुचाकी घसरली आणि तेवढ्यात रेल्वे समोरून आली. रेल्वेचा जोरदार धक्का लागून तो व्यक्ती लांब उडून पडला. यात तो जखमी झाला. हा व्हिडिओ थरारक आणि अंगावर काटा आणणारा आहे. थोडक्यात बचावला असला तरी प्रत्येकवेळी असं होईलच असं नाही. त्यामुळे रेल्वेने घालून दिलेले नियम सर्वांनी पाळणं गरजेचं आहे.

आणखी वाचा : 

पाणी पिता पिता बाटलीत अडकलं तोंड, बदलापुरातल्या ‘त्या’ बिबट्याच्या पिल्लाचा शोध सुरू

जेव्हा Ajay Devgnला राग येतो..! Video Share करत Anand Mahindra म्हणाले, बहुतेक शहर सोडून जावं लागेल..!

VIDEO : बाथरूममध्ये होता कोब्रा साप, महिला गेली अंघोळीला आणि मग पुढे काय धक्कादायक झाले पाहा व्हिडीओ!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.