video | मुलांना योग्य वयात संस्कार देणारा व्हिडीओ व्हायरल, आदर्श पालकाची शिकवण पाहा
सोशल मिडीयावरील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आई आपल्या मुलांना कसे चांगले नागरिक बनावे याचे प्रत्यक्ष कृतीतून धडे देत आहे.
मुंबई : सोशल मिडीयावर अनेकजण व्हिडीओ शेअर करीत असतात. त्यात अनेक व्हिडीओ मजेशीर असतात अनेक व्हिडीओतून आपल्यालाही शिकायला मिळत असते. आपल्या मुंबईतही आता मेट्रोचे जाळे विणले जात आहे. साल 2014 मध्ये मुंबईत घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सुरू झाली होती. आता गेल्यावर्षीपासून मेट्रो 7 आणि मेट्रो 2 अ सुरू झाल्याने मुंबईकर चांगलेच सरावले आहेत, अशात समाजमाध्यमावर एक व्हिडीओ फारच भारी आहे. कोणता आहे व्हिडीओ पाहा…
मेट्रोमध्ये अॅक्सेस कंट्रोल यंत्रणा असते. मुंबईतील उपनगरीय लोकल स्थानकात प्रमाणे कुठनही मेट्रो किंवा मोनोरेल स्थानकात घुसता येत नाही. मेट्रो स्थानकात तिकीट घेतल्यानंतर मेट्रोत शिरण्यापूर्वी तिकीट स्कॅन करतानाचा एका मुलाचा आणि त्याच्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर खूपच व्हायरल झाला आहे.
हाच तो व्हिडीओ पाहा..
Education and morality are given in the family first. pic.twitter.com/mNnmI7aYx9
— The Figen (@TheFigen_) March 9, 2023
या व्हिडीओ आईने गेटवर तिकीट स्कॅन केल्यावर डोअर उघडताच आईच्या पाठी मुलगाही त्याचवेळी शिरतो. त्यामुळे आई त्यास समजावून सांगताना दिसते आहे आणि त्यानंतर नियम समजल्यानंतर तो मुलगा लगेच पुन्हा खालीवाकून त्या बंद गेटच्या आत जातो, त्यानंतर पुन्हा नियमाप्रमाणे आपले तिकीट स्कॅन करून बाहेर पडतो हे ट्वीटर वरील या व्हिडीओत दिसते आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर @TheFigen_ या खात्याने शेअर केला आहे.आपल्या मुलांना शिक्षणाबरोबर सुसंस्कार आणि नितीमत्ता शिकवणे महत्वाचे महत्वाचे आहे असेच शिक्षण हा व्हिडीओ देत आहे. हा व्हिडीओ चायनातील असून त्याला या व्हिडीओला ट्वीटरवर साडे तीन हजार लोकांनी लाईक केला आहे. तर 540 युजरने तो रिट्वीट केला आहे.