Fact check : पुलावर पाणी, भरधाव गाडी, बघता बघता पुलावरुन पुरात! व्हिडीओ नांदेडच्या हिमायतनगरचा?

Nanded Himayatnagar news : हा थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

Fact check : पुलावर पाणी, भरधाव गाडी, बघता बघता पुलावरुन पुरात! व्हिडीओ नांदेडच्या हिमायतनगरचा?
व्हायल व्हिडीओमागचं सत्य काय?Image Credit source: Facebook Video Grab
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 3:16 PM

मुसळधार पावसानं संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra Rain Live Updates) झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेलेत. नांदेडमध्ये (Nanded News) धुव्वाधार सरी बरसल्या आहेत. काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय. दरम्यान, आता एक व्हिडीओ (Nanded Viral Video) व्हायरल झालाय. पुलावरी एक भरधाव जीप सुसाट निघते. पुराच्या पाण्यातील पूर पार करण्याचा चालकाचा प्रयत्न असतो. पूल अर्धा ओलांडून ही कार पुढे जातेही. पण अवघ्या काही मीटरचं अंतर कापण्याच्या आत काळजाचा ठोका चुकवणारी घडना घडते. रस्त्याच्या डाव्या बाजूने सुसाट वेगाने ही कार निघते. पुलावरुन पुराचं पाणी प्रचंड वेगानं वाहत असतं. डाव्या बाजूच्या लेनमधून कार उजव्या बाजूला कशी सरकत जाते, हे चालकालाही कळत नाही. पुलाला कुठेच सुरक्षा पट्ट्या नसतात. बघता बघता पाण्याच्या प्रवाहासोबत कार थेट पुराच्या पाण्यात कोसळलते. हा थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नांदेडच्या हिमायतनगर जवळीत असल्याचा दावा व्हायरल व्हिडीओत्या पोस्टमध्ये करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ :

बीईंग मराठी या फेसबुक पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला अडीचशेहून अधिक लोकांनी शेअर केलं आहे. तर एक हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर रिएक्ट केलं आहे. नांदेडच्या हिमायतनगर जवळील घटना…. ‘कृपया अशी घाई करू नका ? अति घाई संकटात नेई’ असं म्हणत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

एकूण 30 सेकंदांचा हा व्हिडीओ असून या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या एका बाजूला गाड्या थांबल्याचं दिसून आलंय. एक सफेद रंगाची जीप या व्हिडीओत पूल पार करताना दिसते. त्यानंतर ही जीप बघता बघता पुलावरुन थेट पुराच्या पाण्यात कोसळते.

काय आहे व्हिडीओमागील सत्य?

गेल्या ताही दिवसांपासून हा व्हिडीओ फेसबुक, व्हॉट्सअप या सोशल साईट्सवरुन व्हायरल करण्यात आला आहे. पण व्हिडीओ नांदेडच्या हिमायतनगर जवळील असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं समोर आलं आहे. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ नांदेडमधील नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

नांदेडमध्ये मुसळधार

नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे मंगळावीर हिमायतनगर-इस्लापूर पुरावरुन पाणी वाहत होतं. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक चार तास ठप्प होती. सध्या मुसळधार पावसाने नांदडचं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसामुळे नांदेडमधील शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसंच ठिकठिकाणी झाडांडी पडझड झाल्याच्या घटनांचीही नोंद करण्यात आलं. तर किनवट तालुक्यातील दुधवाव येथील अर्धवट पुलाच्या वळण रस्त्यावरील पुराच्या पाण्यात एक ट्रक उलटला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.