Video: ‘डोक्यावर गवताचं ओझं, दोन्ही हात वर आणि आता चालव म्हणावं सायकल’ जमेल? याला जमलंय!
Cyclist vial video : या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दोन्ही हात सोडून सायकल चालवताना दिसतोय. एकानं कारमधून हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.
भारतात टॅलेंटची (Talent in India) काहीच कमी नाही. टॅलेंट काही फक्त शहरात मिळतं असंही नाही. उलट भारतातल्या ग्राामीण (Rural India) भागात खच्चून टॅलेंट भरलेलं आहे. नुकताच एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सायकल चालावणाऱ्या एका तरुणानं कम्मालच केली आहे. आता तुम्ही म्हणाल की, सायकल काय कुणीची चालवू शकतं. खरंच आहे म्हणा तुमचं! सायकल कुणीही चालवू शकतं. पण डोक्यावर गवताचं ओझं घेऊन तुम्हाला कुणी सायकल चालवायला सांगितली तर चालवता येऊ शकेल का? हॅन्डल न पकडता वळणावळणाच्या रस्त्यावर अशी सायकल चालवणं, हे सामान्य माणसाचं काम नाहीच. त्यासाठी असमान्य कौशल्य पणाला लावावं लागतं. बॅलन्स ठेवत वळणावळणाच्या रस्स्त्यावरुन एकाही हातानं हॅन्डल न पकडला सायकल चालवणं म्हणूनच सोपी गोष्ट नाही. पण नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये एका तरुणानं ही खरतनाक गोष्ट शक्य करुन दाखवली आहे.
ट्विटरवर सध्या एक व्हिडीओ शेअर केला जातो आहे. आनंद महिंद्रांसह अनेक दिग्गजांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ रिशेअर केला असून सायकल चालवणाऱ्या या माणसाच्या कर्तबगारीचं कौतुक केलं जातंय.
काय दिसलं व्हिडीओमध्ये?
हा व्हिडीओ नेमका कुणी रेकॉर्ड केला ते कळू शकलेलं नाही. मात्र या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दोन्ही हात सोडून सायकल चालवताना दिसतोय. एकानं कारमधून हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये सायकल चालवणाऱ्यानं आपल्या डोक्यावर मोठं गवताचं ओझं ठेवलंय. दोन्ही हातांनी हे ओझं त्यानं पकडून ठेवलंय. दोन्ही हात वर आहेत, डोक्यावर गवताचं ओझं आहे, आणि अशा अवस्थेत हा माणूस वळणावळण्याच्या रस्त्यावर सायकल चालवताना दिसून आला आहे.
पाहा व्हिडीओ :
Life is beautiful, conditions apply ? pic.twitter.com/N5PTxvXgKr
— Prafull MBA CHAI WALA (@Prafull_mbachai) March 28, 2022
व्हिडीओ पाहून कोण काय म्हणालं?
प्रफुल्ल एमबीए चायवाला यानं हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय, की
आयुष्य खूप सुंदर आहे, पण अटी लागू!
तर दुसरीकडे आनंद महिंद्रा यांनाही या इसमानं प्रभावित केलं. आनंद महिंद्रा याांनी म्हटलंय की…
सायकल चालवणारा हा माणूस अद्भूत आहे. या माणसाची बॉडी जबरदस्तच आहे. त्याचा सायकलवरील बॅल्सही वाखाण्याजोगा आहे. पण एका गोष्टीची मला खंत वाटतेय. याच्यासारखे असे अनेक कर्तबगार आणि टॅलेंटेड लोकं आपल्या देशात आहेत. पण त्यांची ना कुणी दखल घेतंय, आणि त्यांना कुणी दाद देतंय…
This man is a human Segway, with a built in gyroscope in his body! Incredible sense of balance. What pains me, however, is that there are so many like him in our country who could be talented gymnasts/sportspersons but simply don’t get spotted or trained… pic.twitter.com/8p1mrQ6ubG
— anand mahindra (@anandmahindra) March 29, 2022
तर दुसरीकडे हन्सराज मीना यांनी हा व्हिडीओ पाहून भारताचं टॅलेंट हे गावातच वसलेलं असल्याचं हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय.
भारत का “टैलेंट” गांवों में बसता है। pic.twitter.com/lnMHd8yevM
— Hansraj Meena (@HansrajMeena) March 29, 2022
संबंधित बातम्या :
एक-दोन नाही 50-60 गाड्या एकमेकांना आदळल्या, तिघांचा मृत्यू
महागात पडलं ‘होम टॅटू हॅक’, चेहऱ्यावर डागही पडले अन् तात्पुरतं अंधत्वही आलं