VIDEO | उंच टेकडीवरून पडणाऱ्या…व्हिडिओ पाहून तुम्ही सुध्दा मोठा श्वास घेणार
सोशल मीडियावर रोज नवे व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (viral video) झाला आहे. तो काळजाचा ठोका चुकवणारा असल्याचं अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. काही लोक आपले शोक पुर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जातात. काही लोकं एखादी गोष्ट करण्याची इच्छा व्यक्त करण्याच ठरवलं, तर मागे पाहत नाहीत. त्यामध्ये काहीही असतं. काही लोकांना विमानातून आकर्षित ठिकाणी फोटो काढायचे असतात. तर काही लोकांना डोंगरावरुन पाण्यात उडी मारायची असते. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती धबधब्याच्या ठिकाणी राफ्टिंग (rafting video) करीत आहे.
ट्विटरवरती हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. धबधब्याच्या ठिकाणी वेगात असलेल्या पाण्यासोबत राफ्टिंग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. उंच असलेल्या टेकडीवरुन खाली पाणी पडतं आहे. तिथं कोणलाही भीती वाटेल, परंतु राफ्टिंग करणाऱ्या लोकांना अजिबात भीती नसल्याचं त्या व्हिडीओतून स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे ती व्यक्ती पाण्याच्या वेगाने खाली पाण्यात पडली आहे. काहीवेळ ती व्यक्ती गायब झाली असं वाटतंय, परंतु काही वेळाने ती व्यक्ती धबधब्याच्या खालच्या बाजूला दिसून येत आहे.
This is a bravery and skill combined pic.twitter.com/YtYw4Rqujy
— Mind Expanding (@MindExpanding1) August 15, 2023
शौर्य आणि कौशल्याचा मिलाफ
ट्विटरवरती हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर लगेच २२०० लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडीओ शौर्य आणि कौशल्याचा मिलाफ आहे. या व्हिडीओला अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर हे काम खूप मोठं धाडसाचं काम आहे. एका ग्राहकाने लिहीले आहे की, किती कमाल आहे. आणखी एकाने लिहीले आहे की, ही खरचं बहादुरी आहे.