Video | जपानमध्ये असेही घडते, नाल्यात घाण नाही पोहतात रंगीबेरंगी मासे
अति पूर्वेकडील देश म्हणून ओळखला जाणाऱ्या जपानच्या अनेक बाबींचे उर्वरीत जगाला नेहमीच कौतूक वाटत आले आहे. आता जपानच्या एका नाल्याचा एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : स्वच्छतेचे महत्व अनेक संतांनी पटवून दिले आहे. आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसे आपला परिसर स्वच्छ ठेवायला हवा. परंतू अनेक जण रस्त्यावर कचरा टाकत असतात. सार्वजनिक ठिकाणी, वाहनांत कचरा करण्याचे प्रमाण जास्त असते. नाल्यात प्लास्टीक आणि इतर कचरा टाकला जात असल्याने नाले सतत तुंबलेले असतात. पालिका साफसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असते. तरी घाण करणाऱ्यांचे प्रमाण रोज वाढत असते. हेच लोक परदेशात जातात त्यावेळी तेथील स्वच्छतेचे कौतूक करतात. परंतू जपानमध्ये नाल्यातील पाण्यात रंगीबेरंगी मासे सोडलेले असतात.
जपान तेथील नागरिकांच्या कष्टाळू आणि प्रामाणिकपणासाठी ओळखला जातो. जपान इलेक्टॉनिक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. तेथील बुलेट ट्रेनमध्ये गेल्या पन्नास वर्षात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही. परंतू जपानच्या नाल्याचा एक व्हिडीओ पाहून युजर आश्चर्यचकीत झाले आहेत. त्यातील पाणी इतके नितळ आहे की त्याचा तळ आपण पाहू शकतो. आणि त्याहून आश्चर्यचकीत बाबही त्यात रंगीबेरंगी मासे पोहत आहेत. नदीच्या पाण्यासारखा हा स्वच्छ नाला जापानमधील नागासाकी मधला आहे. या व्हिडीओतील दाव्याला टीव्ही नाईनने दुजोरा दिलेला नाही.
येथे पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
या व्हिडीओला सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर timmy727 नावाच्या आयडीवर शेअर केले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1.5 मिलियन म्हणजे पंधरा लाख वेळा पाहीले गेलेले नाही. तर 1 लाख 95 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक्स केले आहे. आणि विविध स्वरुपाच्या प्रतिक्रिया त्यावर दिल्या आहेत. कोणी म्हणतेय की जपान यासाठी सर्वात विकसित देश आहे. तर एका म्हटलेय की मी जपानचा प्रवास केला आहे परंतू ही जागा कशी काय मिस केली ? तर एका युजरने म्हटले आहे की, ‘मी जपानी आहे वास्तविक हे पाणी भाताच्या शेतीसाठी वाहत आहे. त्यामुळे ते मुळातच साफ आहे नाला नाही.’