Video : रस्ता ओलांडण्यास हत्तींना येत होती अडचण; मग रेल्वे मंत्रालयानं तत्परतेनं केलं काम, नेटिझन्सकडून कौतुक

हत्तींचा कळप रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ही घटना तामिळनाडू(Tamilnadu)मधल्या निलगिरी इथं घडली आणि ही क्लिप IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केली. रेल्वे मंत्रालया(Ministry Of Railways)नं तातडीनं कारवाई केली आहे.

Video : रस्ता ओलांडण्यास हत्तींना येत होती अडचण; मग रेल्वे मंत्रालयानं तत्परतेनं केलं काम, नेटिझन्सकडून कौतुक
रेल्वे रूळ ओलांडून जात असताना हत्तींचा कळप
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 7:30 AM

Elephant Video : हत्तींचा कळप रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला. ही घटना तामिळनाडू(Tamilnadu)मधल्या निलगिरी इथं घडली आणि ही क्लिप IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केली. मात्र, प्राण्यांना ओलांडण्यासाठी सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालया(Ministry Of Railways)नं तातडीनं कारवाई केली आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हत्तींचा कळप रेल्वे (Rail) रुळांच्या भिंती ओलांडण्यासाठी धडपडताना दिसत आहे. त्यांना पलीकडे असलेल्या जंगलात जायचं होतं पण कुंपणामुळे ते शक्य झालं नाही. काही सेकंदांनंतर, कळप रुळावरून वर चढून जंगलात प्रवेश करताना दिसतो. सुदैवानं रुळावरून कोणतीही ट्रेन जात नव्हती. ही एक निराशाजनक बाब होती.

‘हा त्रासदायक व्हिडिओ’

सुप्रिया साहू यांनी व्हिडिओला त्रासदायक म्हटलं आणि वन्यजीवांना अनुकूल अशी व्यवस्था असण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, की हत्तींच्या कळपाला धोकादायक रेल्वे ट्रॅकवरून जावं लागलं हे पाहून वाईट वाटलं. संवेदनशील वन्यजीव अनुकूल रचना आणि अंमलबजावणीसाठी सर्व मूलभूत एजन्सींसाठी अनिवार्य SOP आवश्यक आहे.

प्रयत्नांना अखेर यश

ऑनलाइन पोस्ट केल्यानंतर, व्हिडिओला 90kपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. दरम्यान, सुप्रिया साहू यांनीही परिस्थितीबाबत नवीन अपडेट शेअर केले. त्यांनी पोस्ट केलेल्या दुसर्‍या क्लिपमध्ये, एक माणूस प्राण्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी ट्रॅकच्या बाजूनं भिंती पाडताना दिसतो. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी त्यांच्या पुढील व्हिडिओ ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘जेव्हा आम्ही एकत्र काम करतो तेव्हा आम्ही उपाय शोधतो. भिंत पाडली जात आहे. उत्कृष्ट टीमवर्क.’ नेटिझन्सनी टिप्पणी विभागात सुप्रिया साहू यांच्या प्रयत्नांचं आणि रेल्वे मंत्रालयानं केलेल्या तत्पर कारवाईचं कौतुक केलं.

Viral Video : चक्क गेंड्याचं चुंबन घेतेय ‘ही’ तरुणी; यूझर्स म्हणतायत, जंगली प्राण्यांपासून दूर राहा, भडकला तर…

Viral : पोलिसांना फायर नाही तर फूल समजलं आणि..; रक्तचंदन तस्कराच्या रिअल लाइफमध्ये काय घडलं? वाचा

Viral Video : फटाक्यांच्या आवाजाचा कुत्र्याला होत होता त्रास; मग या गोड चिमुरडीनं असं काहीतरी केलं, की…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.