Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : कधीही पाहिला नसेल ‘असा’ धोकादायक विषारी साप; सविस्तर जाणून घ्या, एका क्लिकवर…

Weired snake : थायलंडमधील (Thailand) दलदलीत कथितपणे एक विचित्र साप पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. ही छोटी क्लिप इंटरनेटवर (Social media) व्हायरल (Viral) होताच नेटिझन्स चक्रावून गेलेत. दोन फूट लांबीचा हा साप आहे.

Video : कधीही पाहिला नसेल 'असा' धोकादायक विषारी साप; सविस्तर जाणून घ्या, एका क्लिकवर...
थायलंडमध्ये सापडलेला विचित्र प्राणीImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 11:26 AM

Weired snake : आपण विविध सापांविषयी ऐकले आहे. त्यातले काही साप आपण पाहिलेही असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला असा साप दाखवणार आहोत, जो तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. थायलंडमधील (Thailand) दलदलीत कथितपणे एक विचित्र साप पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. ही छोटी क्लिप इंटरनेटवर (Social media) व्हायरल (Viral) होताच नेटिझन्स चक्रावून गेलेत. दोन फूट लांबीचा हा विचित्र प्राणी एका पात्रात फिरताना दिसत आहे. एका अहवालात असे म्हटले आहे, की थायलंडमधील सखोन नाखोन येथील 49 वर्षीय स्थानिक ‘तू’ या व्यक्तीने हा साप पाहिला होता. क्लिपची तारीख, अचूक स्थान आणि सत्यता याची अद्याप पुष्टी झालेली नाही. अहवालात असे म्हटले आहे की सखोन नखोन येथील ‘तू’ घराजवळील दलदलीच्या पाण्यात हा प्राणी घसरताना दिसला.

गवत आणि शेवाळ यांच्यात दिसून येत नाही साप

पाण्याच्या आत असलेल्या गवत आणि शेवाळ याच्यामध्ये साप दिसत नाही. तो पाण्याखाली गायब झाल्याचे दिसते. याहू न्यूजने तूच्या 30 वर्षीय भाचीच्या हवाल्याने म्हटले आहे, की मी यापूर्वी कधीही असा साप पाहिला नव्हता. माझ्या कुटुंबाला आणि मला वाटले की लोकांना त्याबद्दल शोधणे आणि संशोधन करणे उपयुक्त ठरेल. अधिकारी ओळखीच्या प्रतीक्षेत साप तू यांच्या घरी ठेवण्यात आला आहे.

अंगावर शेवाळ

न्यूजफ्लेअरच्या म्हणण्यानुसार, काही स्थानिकांनी सांगितले, की हा सरपटणारा साप असू शकतो, कारण त्याच्या शरीरावर शेवाळ उगवत असल्याचे दिसते. न्यूजफ्लेअरमधील एका अहवालात म्हटले आहे, की काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपटणारा प्राणी हा पाण्यातला साप आहे, जो फुत्कारतो. दलदलीत राहिल्यामुळे त्याच्या अंगावर इतके शेवाळ साचले की ते फरसारखे दिसू लागले. साप पाण्यात आणि खडकाळ खड्ड्यांमध्ये भक्ष्य पकडण्यासाठी आत जाताना दिसला.

विषारी सापांची एक प्रजाती

NSW सेंट्रल कोस्टवरील वाइल्डलाइफ एआरसी येथील सर्प प्रजाती समन्वयक सॅम चॅटफिल्ड यांनी सांगितले, की सापाच्या शीर्षावरील फर केराटिनपासून बनलेले आहे. हे त्वचेच्या वर एक थर असल्यासारखे आहे. पफ-फेस्ड वॉटर स्नेकला मास्क्ड वॉटर स्नेक देखील म्हणतात. ते दक्षिणपूर्व आशियातील उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळणाऱ्या होमलोप्सिडे कुटुंबातील विषारी सापांची एक प्रजाती आहेत. ही प्रजाती उत्तर सुमात्रा ते सालंगा बेट, इंडोनेशिया आणि बोर्नियोपर्यंत आहे. ते मलेशियन द्वीपकल्प आणि अत्यंत दक्षिणी थायलंडमध्येदेखील उपस्थित आहेत.

आणखी वाचा :

याला म्हणतात Perfect stunt; सरावाशिवाय ‘हे’ शक्यच नाही, एकदा ‘हा’ Viral video पाहाच

‘चाचा ओss चाचा…’ हे आजोबा भलतेच जोशात आलेत, बहुतेक 50 वर्षानंतर भेटले असावेत! Funny video viral

Video : खाद्यपदार्थांवरचे प्रयोग काही थांबेना! आता Omeletteची ‘ही’ नवी Recipe होतेय Viral

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.