Viral Video | काय टॅलेंट आहे, महिला वेटरने एकाच वेळी उचलले बियरचे 13 ग्लास

रेस्टॉरंटमध्ये काम करणारे वेटर अनेक वेळा त्यांचे काम जलद करुन ग्राहकांना चकीत करण्यासाठी निरनिराळ्या कृल्प्त्या करीत असतात. असाच एका महिला वेटरचा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

Viral Video | काय टॅलेंट आहे, महिला वेटरने एकाच वेळी उचलले बियरचे 13 ग्लास
HOTEL Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 8:02 PM

नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांना एकदम चपळ रहावे लागते. चांगली सर्व्हीस देऊन कस्टमरना खुश ठेवावे लागत असते. त्यामुळे वेटर आणि वेट्रेस आपआपल्या कामात प्राविण्य मिळवित आपली छाप पाडत वाहवा मिळवित असतात. तसेच काम करताना सतत इनोव्हेशन करीत नवनवीन संकल्पना लढवित असतात. आता सोशल मिडीयावर एका महिला वेटरचा अनोखा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ही वेट्रेस आपल्या दोन्ही हातांनी बियरनी भरलेल्या मोठ्या आकारांच्या ग्लासांना उचलत असताना दिसत आहे. बॅलन्स इतका सुंदर आहे एक ग्लासातून बियर सांडत नाही.

व्हायरल क्लिपचा एक्स ( X ) वर ( @TansuYegen ) नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहीले आहे की म्युनिकच्या ऑक्टोबर फेस्टमध्ये वेट्रेसची स्ट्रेंथ कमाल आहे. केवळ 55 सेंकदाच्या या क्लिपमध्ये आपण पाहू शकता की महिला काऊंटरवर उभी आहे. आणि बियरच्या ग्लासांना एकत्र करीत आहे. नंतर हे ग्लास एकत्र करीत सर्व ग्लासना एकाच वेळी उचलते. असे केल्याने कमी वेळेत जादास जादा ऑर्डर सर्व्ह करता येत आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी वेळात ऑर्डर मिळत आहेत. त्यामुळे ग्राहक पुन्हा पु्न्हा या बारला भेट देतील. या महिला वेटरच्या हातांची ताकत जबरदस्त आहे. कारण इतक्या साऱ्या ग्लासांचे वजन जादा असणार आहे. एक्स युजरच्या मते म्युनिकच्या ऑक्टोबर फेस्टच्या दरम्यानचे हे दृश्य आहे. ज्यास बियर फेस्ट देखील म्हणतात.

येथे पाहा व्हिडीओ –

21 सप्टेंबर रोजी शेअर केलेल्या या व्हिडीओने लोकांना आकर्षित केले आहे. या व्हिडीओला 18 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेक युजर्स कमेंट देत आहेत. एका युजरने लिहीलेय की वाह ! काय कमाल आहे ! दुसऱ्या एका युजरने लिहीलेय की हातांमध्ये ताकद आहे मुलीच्या ! तर अन्य एका युजरने लिहीलेय की ही तर रेसलर सारखी आहे. हा व्हिडीओ पाहून तुमची काय प्रतिक्रीया आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.