Google Search | एकट्या असताना मुली Google वर काय सर्च करतात ?

Google Search | तुम्ही गूगलवर किती अतरंगी गोष्टी सर्च करता ? या संदर्भात एका रिपोर्ट मध्ये अनेक खुलासे करण्यात आले आहेत.

Google Search | एकट्या असताना मुली Google वर काय सर्च करतात ?
या गोष्टी करतात सर्चImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 2:10 PM

Google Search | आजकालच्या टेक्नोसॅव्ही (Technology) जमान्यात एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल की लगेच गुगलवर सर्च केली जाते. मिनिटाभरात सर्व माहिती तुमच्यासमोर सादर होते. गुगलवर (Google) काहीही सर्च करणे खूप सोपे होते. एखादा शब्द लिहा आणि त्याच्याशी संबंधित शेकडो सर्च रिझल्ट्स तुमच्या स्क्रीनसमोर सादर होतात. वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर, गुगल हा आजच्या जमान्यातील जादूगार आहे, जो एकापेक्षा एक अशी वेगवेगळ्य विषयावरची माहिती, उपाय आपल्यासमोर ठेवतो. काही अडचण असेल करा गुगल, पत्ता शोधायचा असेल करा गुगल, आजारी पडलात , औषध हवंय किंवा डॉक्टरांचा नंबर हवा,. तर लगेच गुगलवर सर्च (information search on Google) करा. एक ना अनेक गोष्टींबद्दल माहितीचे भांडार गुगलवर असते. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आपापल्या मतानुसार गुगलवर काही ना काही सर्च करत असते. पण तुम्हाला माहीत आहे का, की गुगल आणि त्यासारख्या अनेक टेक कंपन्या आणि डेटा ॲग्रीगेटर्सतर्फे दरवर्षी एक अहवाल प्रकाशित करण्यात येतो. ज्यामध्ये गुगलवर सर्वात जास्त कोणती माहिती वा कोणता शब्द सर्च करण्यात आला, हे त्यामध्ये नमूद करण्यात आलेले असते. गेल्या काही काळापासून महिलांच्या सर्च रिझल्टबद्दल बरेच अहवाल (Reports) येत होते. एका रिपोर्टमध्ये अविवाहीत मुली गुगलवर काय सर्च करतात, याची माहिती होती. या मुली गुगलवर सर्वात जास्त काय सर्च करतात, हे त्या रिपोर्टमध्ये लिहीले होते.

काय सांगते अहवालाची आकडेवारी ?

नव्या रिपोर्टनुसार भारतात एकूण 15 कोटी इंटरनेट युजर्स असून त्यामध्ये अंदाजे 40 टक्के महिला आहेत, ज्या आपल्या कामासाठी इंटरनेटचा वापर करतात. बहुतांश वेळेस कामाशी संबंधित माहिती गुगलवर सर्च केली जाते.

तरुणी सर्वात जास्त काय सर्च करतात ?

या रिपोर्टमध्ये अशी माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे, ज्यातून महिला आणि तरूणींच्या इंटरनेट सर्चबद्दल बरीच समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

1) करीअरशी संबंधित गोष्टी होतात सर्च  अनेक तरुण मुली बहुतांश वेळेस आपल्या करिअरशी संबंधित माहिती सर्च करतात. उदा – पुढील शिक्षणासाठी कोणते कॉलेज निवडावे, पुढे काय (काम ) करावे, कोणते करिअर निवडावे ? अशा गोष्टी सर्च केल्या जातात.

2) ऑनलाइन शॉपिंगसंदर्भातील सर्च  ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर बहुतांश वेळेस कपडे सिलेक्ट केले जातात. तसेच नवे कलेक्शन पासून डिस्काऊंटचे पर्याय अशा अनेक गोष्टी सर्च केल्या जातात. मात्र यात काही नवे नाही. यापूर्वीही अनेक रिपोर्ट्समध्ये ही माहिती समोर आली होती की ऑनलाइन व्हर्च्युअल विंडो शॉपिंग पासून बऱ्याच गोष्टी तरुणी सर्च करतात

3) सौंदर्याशी निगडीत माहिती  देशी उपाय, रंग उजळण्यासाठीचे उपाय, घरी वॅक्सिंग कसे करावे, असे अनेक घरगुती उपाय आणि ब्युटी ट्रिटमेंट्सबाबत गुगलवर सर्च केले जाते. यातील अनेक सर्च रिझल्ट्स हे फॅशनशी संबंधितही असतात.

4) लेटेस्ट डिझाइन्स  मेहंदी डिझाइन्स, रांगोळीचे डिझाइन्स, घर सजवण्याच्या वस्तू अशा अनेक गोष्टींबद्दल सर्च केले जाते.

5) रोमँटिक गाणी  बऱ्याचशा तरुण मुली जास्त करून रोमँटिक गाणी सर्च करतात आणि त्यामध्ये रोमँटिक शायरींचाही समावेश असतो.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.