Viral Video : फ्लाईटमध्ये नेमकं काय घडलं ज्यामुळे महिलेला काढावे लागले कपडे
एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक महिला तिच्या अंगावरील कपडे काढताना दिसत आहे. असं काय होतं ज्यामुळे संबंधित महिला अशा प्रकारचं कृत्य करते. हा व्हिडीओ एका विमानातील आहे.
Trending Flight Video : सोशल मीडियावर रोज काहीना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ इतके भयंकर आणि भीतीदायक असतात की त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. अशाच प्रकारे एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक महिला तिच्या अंगावरील कपडे काढताना दिसत आहे. असं काय होतं ज्यामुळे संबंधित महिला अशा प्रकारचं कृत्य करते. हा व्हिडीओ एका विमानातील असून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना एका रशियन विमानात घडली जे स्टॉपोल शहरातून मॉस्कोला जात होतं. या विमानातील एक महिला टॉयलेटमध्ये गेली आणि तिथे सिगारेट ओढू लागली. हा सर्व प्रकार विमानातील स्टाफ मेंमबरच्या लक्षात आल्यावर त्या महिलेला सिगारेट ओढण्यास मनाई केली. त्यावेळी महिलेला सिगारेट ओढू न दिल्याने तिला राग आला. सर्वांसमोर कपडे काढले आणि मोठ्याने ओरडू लागली.
Striptease of a passenger of the flight “Aeroflot” Stavropol – Moscow. The woman smoked in the toilet, undressed and started to get into the pilots shouting that everyone would die. Then she bit the stewardess and spent the rest of the flight handcuffed. pic.twitter.com/DvEyUtp8OX
— PLANES OF LEGEND (@PlanesOfLegend) February 14, 2023
एकवेळ मी मरून जाईल पण सिगारेट ओढणं सोडणार नाही, असं संबंधित महिला बोलत होती. महिला स्टाफ मेंबरने संबंधित महिलेच्या अंगावर टॉवेल टाकला मात्र महिला उद्धटपणेच सर्वांसमोर वागत होती. एका पुरूष स्टाफ मेंबरच्या हाताचा तिने चावा घेतला. जेव्हा विमानतळावर सर्व प्रवासी उतरले तेव्हा त्या पुरूष स्टाफ मेंबरला दवाखान्यात नेण्यात आलं. अँजेलिका मॉस्कविटीना असं महिलेचं नाव होतं. तिला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओची टीव्ही9 मराठी पुष्ठी करत नाही.
दरम्यान, विमानामध्ये नियमानुसार धुम्रपान करण्यास मनाई आहे. मात्र तरीसुद्धा काहीजण नियम मोडताना दिसतात. याआधी चालू फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने दारूच्या नशेत लघुशंका केली होती. एअर इंडियाच्या विमानामध्ये हा प्रकार घडला होता. काही दिवसानंतर पोलिसांनी संबंधित प्रवाशाला अटक केली होती. त्यामध्ये समोर आलं होतं की संबंधित आरोपी अमेरिकेमधील नामांकित कंपनीमध्ये काम करत होता.