भारतीय रेल्वेतील जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल या शब्दांचा अर्थ काय? जाणून घ्या
काही रेल्वे स्थानकांच्या नावापुढे जंक्शन, सेंट्रल किंवा टर्मिनस असे शब्द लिहिलेले असतात. या शब्दांचा नेमका अर्थ काय असतो? (Difference Between Railway Terminus Junction and Central)
मुंबई : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. देशभरात तब्बल 7 हजार 349 रेल्वे स्थानक आहेत. भारतात दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात. अनेकांना एखाद्या ठिकाणी प्रवास करायचे असल्यास तर ते रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. भारतात अशी फार कमी लोक आहेत ज्यांनी कधीही ट्रेनने प्रवास केलेला नाही.
तुम्हीही जर भारतीय रेल्वेचे नियमित प्रवासी असाल, तर तुम्हाला प्रवासादरम्यान अनेक रेल्वे स्थानक दिसत असतील. यातील काही रेल्वे स्थानकांच्या नावापुढे जंक्शन, सेंट्रल किंवा टर्मिनस असे शब्द लिहिलेले असतात. या शब्दांचा नेमका अर्थ काय असतो? फक्त काही स्थानकांपुढे हे विशिष्ट शब्द का लिहिलेले असतात? असा प्रश्न तुम्हाला सतत पडत असेल. आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नांची उत्तर देणार आहोत. (What is Difference Between Railway Terminus, Junction and Central)
भारतातील स्थानकांची चार विभागत विभागणी
भारतीय रेल्वेमध्ये असलेली हजारो रेल्वे स्थानक ही काही विशिष्ट श्रेणीमध्ये विभागली गेली आहे. त्या प्रत्येक श्रेणीच्या नावाचा एक अर्थ असतो. तसेच ती श्रेणी एक विशेष संदेशही देते. यात जंक्शन, टर्मिन्स, सेंट्रल आणि स्टेशन या तीन श्रेणींचा समावेश आहे.
?जंक्शन -Junction
ज्या रेल्वेस्थानकातून दोन किंवा अधिक मार्ग निघतात त्यांना जंक्शन असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या स्टेशनवरुन जर तीन वेगवेगळ्या ठिकाणावरुन रेल्वे येत असेल आणि तीन वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही रेल्वेतून जाऊ शकत असाल, तर त्याला जंक्शन असे म्हटलं जाते. भारतामध्ये 300 पेक्षा जास्त जंक्शन आहेत. भारतातील सर्वात मोठे जंक्शन हे मथुरा आहे. या ठिकाणी सर्वाधिक सात मार्ग निघतात.
तर सेलम जंक्शनवरुन सहा मार्ग तर विजयवाडावरुन पाच मार्ग निघतात, हे देखील सर्वात मोठ्या जंक्शनच्या यादीत येतात. तसेच दिल्ली जंक्शनमधून चार मार्ग निघतात. दिल्ली जंक्शन ते दिल्ली शाहदरा, सबजी मंडी, सदर बाजार आणि दिल्ली किशनगंज रेल्वे स्थानक मार्ग देशाच्या विविध भागात जातात. दिल्ली जंक्शन व्यतिरिक्त हावडा जंक्शन, पटना जंक्शन, प्रयागराज जंक्शन इत्यादी देशातील प्रमुख जंक्शनमध्ये आहेत.
?सेंट्रल – Central
ज्या रेल्वे स्थानकाच्या नावाच्या पुढे सेंट्रल असते, ते स्टेशन शहरातील सर्वात जुने आणि प्रमुख रेल्वे स्टेशन मानले जाते. तसेच हे स्टेशन शहरातील मुख्य परिवहन केंद्रही मानले जाते. सेंट्रल लिहिलेल्या स्थानकांवर इतर रेल्वे स्थानकांपेक्षा जास्त सेवा पुरविल्या जातात. हे रेल्वे स्थानक शहरातील इतर स्थानकांपेक्षा जास्त व्यस्त असते. ही रेल्वे स्थानके बरीच मोठी असतात. या स्थानकांवर देशातील प्रमुख शहरे जोडणार्या रेल्वे मोठ्या संख्येने ये-जा करतात. देशातील प्रमुख मध्य रेल्वे स्थानकांमध्ये मुंबई सेंट्रल, कानपूर सेंट्रल, चेन्नई सेंट्रल इत्यादींचा समावेश आहे. (What is Difference Between Railway Terminus, Junction and Central)
?टर्मिनस/टर्मिनल – Terminus / Terminal
जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसविषयी अनेकदा ऐकले असेल. कित्येदा या स्थानकावरुन प्रवासही केला असेल. टर्मिनल किंवा टर्मिनसचा अर्थ म्हणजे शेवटचे स्टेशन. या स्टेशनच्या नंतर कोणतेही स्टेशन किंवा कोणताही रेल्वेचे स्थानक नसते. टर्मिनल रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या ट्रेनच्या गाड्या फक्त एकाच दिशेने जातात.
देशभरात एकूण 27 टर्मिनस स्टेशन आहेत. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दोन टर्मिनस स्टेशन आहेत. या दोन्ही स्थानकावरुन फक्त एकाच दिशेला ट्रेन धावतात.
?स्टेशन – Station
आता वरील एखाही विभागणी सहभागी न होणाऱ्या जागेला स्टेशन असेल म्हणतात. या ठिकाणी रेल्वेचा थांबा दिला जातो. प्रवाशांची ये-जा असते. भारतात हजारो रेल्वे स्थानक आहेत. (What is Difference Between Railway Terminus, Junction and Central)
संबंधित बातम्या :
कारखान्यांच्या छतावर गोल गोल फिरतं ते नेमकं काय? त्याचं काम कसं चालतं?
गगनचुंबी इमारतींच्या बांधकामादरम्यान हिरवा कपडा का वापरतात? जाणून घ्या कारण