नवीन पर्स, बॅग, बूट इतर गोष्टींमध्ये असलेल्या छोट्या सिलिका पॅकेट्स नेमके का वापरतात? त्याच्या मागचे कारण काय?

सिलिका जेलचा नेमका उपयोग कशासाठी केला जातो, ते पॅकेट्स नेमके का वापरतात? त्याच्या मागचे कारण काय? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. (What is silica gel? How to use silica gel packets)

नवीन पर्स, बॅग, बूट इतर गोष्टींमध्ये असलेल्या छोट्या सिलिका पॅकेट्स नेमके का वापरतात? त्याच्या मागचे कारण काय?
silica gel packet
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 3:42 PM

मुंबई : आपण शॉपिंग केल्यानंतर अनेकदा नवीन पर्स, बॅग, बूट यांसारख्या गोष्टींमध्ये छोटे छोटे पांढऱ्या रंगाचे पॅकेट्स असतात. आपल्यातील बरेच जणांना त्याचा उपयोग माहिती नसतो. अनेक जण सिलिका पॅकेट फेकून देतात. पण याचा नेमका उपयोग कशासाठी केला जातो, ते पॅकेट्स नेमके का वापरतात? त्याच्या मागचे कारण काय? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. (What is silica gel? How to use silica gel packets)

सिलिका जेल म्हणजे काय? 

सिलिका जेलचे हे पॅकेट्स ही अंत्यत उपयुक्त असतात. कोणत्या वस्तूमध्ये दमटपणा येऊ न देता त्यातील आर्द्रता शोषून घेते. तसेच ती वस्त पूर्णपणे कोरडी ठेवण्याचे काम करते. या पॅकेट्समध्ये मण्यांसारखी वस्तू असते.

सिलिका जेलचे फायदे

कॅमेरा ड्राय ठेवतो

अनेकदा कॅमेऱ्याच्या लेन्सवर फॉग जमा होतो. त्यामुळे कॅमेरा लवकर खराब होतो. त्यामुळे जर तुम्ही कॅमेरा सिलिका जेलमध्ये ठेवला तर तो ड्राय राहतो. यामुळे कॅमेरा खराब होत नाही.

कपड्यांना ओलसरपणा येत नाही

थंडी संपल्यानंतर आपण स्वेटर, जॅकेटर यासारख्या गोष्टी कपाटात ठेवून देतो. त्यामुळे त्यात ओलसरपणा येतो. तसेच जेव्हा आपण ते कपडे पुन्हा वापरण्यासाठी काढतो, तेव्हा त्यातून विशिष्ट प्रकारचा दुर्गंध येतो. अशावेळी जर तुमच्याकडे सिलिका जेलचे पॅकेट असतील, तर ते खिशात किंवा त्या कपड्यांमध्ये ठेवा. यामुळे तुमचे थंडीतील कपडे खराब होणार नाहीत.

⏩पाण्यात पडलेल्या फोनचे सरंक्षण

आपल्यापैकी अनेकांचा फोन पूल, बाथटब किंवा समुद्राच्या पाण्यात पडतो. कधी कधी कामाच्या दरम्यान त्यावर पाणीही सांडते. अशावेळी अजिबात पॅनिक न होता फोनमधील बॅटरी आणि मेमरी कार्ड काढून बाजूला ठेवा. यानंतर एका बाऊलमध्ये सिलिका जेलचे पॅकेट फोडून त्यात तुमचा फोन ठेवा. यामुळे सिलिका जेल फोनमधील सर्व पाणी शोषून घेईल आणि तुमचा फोन पूर्वीप्रमाणे सुरु होईल.

⏩पुस्तके आणि फोटो अल्बमसाठीही उपयोगी

अनेकदा जुनी पुस्तक किंवा फोटो अल्बम यांच्यावर किडे, बुरशी किंवा वाळवी लागते. कधीकधी तर त्यावर पिवळसर रंगाचे दाग दिसातात. अशावेळी तुम्ही सिलिका जेलचे पॅकेज त्या पुस्तक किंवा अल्बममध्ये ठेवा. जर ती पुस्तक ओलसर असतील तर ती उन्हात वाळवा. त्यानंतर सिलिका जेलमध्ये ठेवा. (What is silica gel? How to use silica gel packets)

⏩ रेजर ब्लेडसाठी उपयुक्त

आपण घरात आणलेले महागड्या रेजर ब्लेडला लवकर गंज पकडतो. यापासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर सिलिका जेल फार उपयुक्त ठरते. रेजर ब्लेडने शेविंग केल्यानंतर तो व्यवस्थित धुवून कोरडा करता. यानंतर एका डब्ब्यात सिलिका जेलचे पॅकेट फोडून त्यात तो ब्लेड ठेवा. यामुळे तो ब्लेड दीर्घकाळ टिकेल.

⏩ फ्रिजमधील आयसिंग थांबवते

जेव्हा तुम्ही फ्रिजमध्ये काही सामान ठेवता तेव्हा त्यावर बर्फ जमा होते. जर तुम्ही या समस्येपासून त्रस्त असाल तर एका बाऊलमध्ये सिलिका जेलचे पॅकेट ठेवा. यामुळे बर्फ जमा होणार नाही. तसेच भाज्या मॉइश्चरायझ होणार नाहीत.

⏩ दागिने सुरक्षित राहतात 

अनेक महिलांचा वीक पॉईंट म्हणजे दागिने. पण अनेकदा एखादा बॉक्समध्ये ठेवल्यानंतरही हवेत असलेल्या आर्द्रतेमुळे दागिने काळे पडतात. अशावेळी त्या दागिन्यांच्या बॉक्समध्ये सिलिका जेलचे पॅकेट ठेवावे. यामुळे दागिन्यांवर विशिष्ट चमक येते. तसेच ती काळीही पडत नाही.

⏩ रुम फ्रेशनर वापर 

सिलिका जेलच्या या उपयोगास दुर्लक्षित करणे कठीण आहे. आपला आवडता एसेन्शियल ऑईल घ्या आणि त्यामध्ये सिलिका बीड्स टाका. हे एका उत्तम रुम फ्रेशनरप्रमाणे काम करेल. (What is silica gel? How to use silica gel packets)

संबंधित बातम्या : 

कारखान्यांच्या छतावर गोल गोल फिरतं ते नेमकं काय? त्याचं काम कसं चालतं?

गगनचुंबी इमारतींच्या बांधकामादरम्यान हिरवा कपडा का वापरतात? जाणून घ्या कारण

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.