Highway आणि Expressway मध्ये काय असतो फरक ? मुलाखतीत विचारात हा प्रश्न
अनेकदा नोकरीसाठीच्या मुलाखतींमध्ये हायवे आणि एक्स्प्रेस वेमधील फरक विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर फार कमी लोकांना माहीती असते.

मुंबई : कोणत्याही देशाची किंवा राज्याची प्रगती तेथील रस्ते कोणत्या दर्जाचे आहेत त्यावरून मापली जात असते. अमेरिकचे राष्ट्रपती जॉन एफ केनेडी अमेरिका विकसित आहे त्यामुळे तेथील रस्ते चांगले आहेत असे नव्हे तर येथील रस्ते चांगले आहेत म्हणून हा देश विकसित आहे असे म्हटले होते. त्यामुळे पायाभूत विकासाला सर्वात जास्त महत्व दिले जात असते. त्यात रस्ते कामाला जास्त प्राधान्य दिले जाते. अनेक मुलाखतीत हायवे आणि एक्सप्रेसवे मधील फरक विचारला जातो. बऱ्याच लोकांना त्याचे उत्तर येत नाही. काय आहे याचे उत्तर जाणून घेऊ या
एक्सप्रेसवे आणि हायवेमध्ये काय असतो फरक ?
1. हायवे आणि एक्सप्रेस वे मध्ये खूपच फरक असतो. त्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे हायवे वर प्रवेश करण्यासाठी विशेष असा अॅक्सेस कंट्रोल नसतो. हायवेवर कुठूनही प्रवेश करता येतो. तर एक्सप्रेस वे वर प्रवेश करण्यासाठी एकच रस्ता किंवा प्रवेश असतो. आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग किंवा प्रवेश असतो. या प्रवेश मार्गाला अॅक्सेस कंट्रोल असे म्हटले जात असते.
2. हायवे आणि एक्सप्रेस वे मधील दुसरे मोठा फरक हा आहे की हायवे जमीनीला समतल बांधला जातो. तर एक्सप्रेस वे बांधताना तो जमीनीच्या पासून थोड्या उंचावर बांधला जात असतो. एक्सप्रेस वे ला कडेला तटबंदी असते. त्यामुळे कोणतेही जनावर किंवा बाहेरचा मनुष्य तेथे प्रवेश करू शकत नाही. हायवे वर अशी कोणतीही सुविधा नसल्याने हायवेवर जास्त अपघात होत असताना दिसतात.
3. हायवे आणि एक्सप्रेस वे वाहनांची वेग मर्यादा भिन्न असते. हायवेवर जर वाहनांची कमाल वेग मर्यादा 100 कि.मी. प्रति तास असेल तर एक्सप्रेस वे वर कमाल वेग 120 कि.मी. प्रति तास असतो. हायवेच्या तुलनेत एक्सप्रेस वे वर त्यामुळे प्रवासाला त्यामुळे कमी वेळ लागत असतो.