जगभरात JCB मशीनचा रंग पिवळाच का असतो? जाणून घ्या या मशीनचं खरं नाव

| Updated on: Feb 03, 2023 | 11:06 AM

जगभरात वापरल्या जाणाऱ्या या जेसीबी मशिनचा रंग पिवळा का असतो हे तुमच्या कधी लक्षात आले आहे का? किंवा या मशिनला JCB च का म्हणतात? याचा अर्थ काय?

जगभरात JCB मशीनचा रंग पिवळाच का असतो? जाणून घ्या या मशीनचं खरं नाव
JCB real name
Image Credit source: Social Media
Follow us on

आपण आपल्या आजूबाजूला किंवा एखाद्या बांधकाम साइटवर पिवळ्या रंगाचे जेसीबी मशीन पाहिले असेल. या मशिनच्या माध्यमातून सर्वात मोठी इमारत बांधणे अतिशय सोपे जाते. या मशिनचा वापर अनेक कामांसाठी केला जातो, पण जगभरात वापरल्या जाणाऱ्या या जेसीबी मशिनचा रंग पिवळा का असतो हे तुमच्या कधी लक्षात आले आहे का? किंवा या मशिनला JCB च का म्हणतात? याचा अर्थ काय? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहित नसतील तर हरकत नाही, आज आम्ही तुम्हाला यामागचं खरं कारण सांगणार आहोत.

खरे तर पूर्वी या यंत्राचा रंग लाल किंवा पांढरा असायचा, परंतु बांधकाम साईटवर काम करताना ही यंत्रे त्यांच्या रंगामुळे दूरवरून दिसत नव्हती. त्यामुळे या मशिनचा रंग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. बऱ्याच संशोधनानंतर या यंत्रांचा रंग जगभरात पिवळा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

वास्तविक, इतर रंगांच्या तुलनेत पिवळ्या रंगाला 1.24 पट जास्त आकर्षण असल्याने या यंत्रांचा रंग पिवळा ठेवण्यात आला होता. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी दूरवरून ही यंत्रे सहज पाहता येतात. याशिवाय आपल्याला पिवळा रंग थेट दिसला नसला तरी त्याची झलक आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचते.

आता या मशिनबद्दल बोलायचे झाले तर प्रत्यक्षात या मशीनचे नाव JCB मशीन नाही. खरं तर जेसीबी हे मशीन बनवणाऱ्या कंपनीचं नाव असून कंपनीचे मालक आणि ब्रिटिश अब्जाधीश जोसेफ सिरिल बामफोर्ड यांचं नाव आहे. तर या मशीनचे खरे नाव बैकहो लोडर (Backhoe Loader) आहे.