व्हॉट्सअपमुळे वाचले मायलेकांचे प्राण, सिरीयाच्या भूंकपातील लोक लोकेशन शेअर करून मदतीसाठी याचना करीत आहेत
सिरीया आणि तुर्कीच्या भूकंपाने होत्याचे नव्हते झाले. हजोरो इमारती खाली दबलेले अनेक जीव केवळ नशीब थोर असल्याने सुदैवाने बचावले जात आहेत. इमारतीच्या ढीगाऱ्या खालून व्हॉट्सअपवर लोकेशन शेअर केल्यानेही लोकांचे जीव वाचत आहेत.
दिल्ली : सिरीया आणि तुर्कीतील ( Turkey ) भूंकपातील मृत्यूंची संख्या आता वीस हजाराच्या पुढे गेली आहे. तीन दिवसांनंतरही अनेक जण ढीगाऱ्याच्या खालून जीवंत सापडत आहेत. काही जण आता आपल्या मोबाईलचा ( mobile ) वापर करून स्वत: चे लोकेशन मित्रांना कळवित आहेत आणि मदतीची याचना करीत आहेत. त्यामुळे त्यांना झटपट शोधण्यास मदत मिळत आहे. अशाच पद्धतीने बोरान आणि त्याच्या आईला व्हॉट्सअपवर त्याने लोकेशन ( Location ) शेअर केल्याने त्याला बचाव पथकाने वाचविल्याची अजब कहानी पुढे आली आहे.
इर्स्टन तुर्की येथे 20 वर्षीय बोरान कुबाट याला त्याच्या इमारतीच्या ढीगाऱ्या खालून त्याने व्हॉट्सअपवर त्याचे लोकेशन शेअर केल्याने वाचविल्याचे उघडकीस आले आहे. परंतू त्याने नेमके काय केले हे वाचणे इंटरेस्टीक आहे. बोरान आणि त्याची आई इस्तंबुल मधून त्याच्या मलाट्या येथे आले आणि हे लागोपाठचे दोन भूकंप घडले.
सकाळी आलेल्या पहिल्या भू्ंकपात तो आणि त्यांचे कुटुंबिय सुदैवाने वाचले, परंतू ते पुन्हा त्यांच्या अपार्टमेंट गेले आणि तोच भूंकपाचा दुसरा मोठा 7.5 रिश्टरस्केलचा धक्का बसला, आणि बोरान त्यांच्या कुटुंबियांसह इमारतीच्या ढीगाऱ्या खाली अडकला. त्याला अखेर आपण आपल्या मोबाईलने मदतीची मागणी करू शकतो हे त्याच्या लक्षात आले. आणि त्याने व्हॉट्सअपच्या स्टेटसवर आपला व्हिडीओ बनवून लोकेशन शेअर करीत मित्रांना मदतीसाठी हाक दिली. जे कोणी हा व्हिडीओ पाहात आहात, त्यांनी प्लीज मदतीसाठी पुढे यावे आम्ही अडकलो आहोत आम्हाला सोडवावे असे आवाहन त्याने त्या व्हिडीओद्वारे केले.
Desperate earthquake survival used Instagram and Whatsapp to plead rescuers to find him and his family.#TurkeySyriaEarthquake pic.twitter.com/oS65LYeFew
— JasminDimash_Dear???? (@FairyDream8) February 9, 2023
तुर्कीश न्यूज वेबसाईट अंडोलू एजन्सीशी बोलताना बोरान पुढे म्हणाला, आमचे नेमके लोकेशन शोधण्यासाठी आलेल्या मित्रांनी एका मोठ्या हातोड्याने आम्हाला शोधण्याचा चार ते पाच प्रयत्न केले. अखेर आपण आपल्या आईसह ढीगाऱ्यातून सुखरूप बाहेर आलो, परंतू त्याचे काका आणि आजी अजूनही ढीगाऱ्याखालीच असल्याचे त्याने सांगितले. सोशल मिडीया सध्या अशा मदतीच्या याचनांनी भरून वाहत आहे. सिरीया आणि तुर्कीत लोक अजूनही इमारतीच्या ढीगाऱ्यांतून सुखरूप बाहेर येत आहेत.
युट्युबरही इंस्टाग्राममुळे वाचला
युट्युबर चार्मक्वेल उर्फ फिरत यायला याला देखील हताय जिल्ह्याच्या सेंट्रल अंताक्या येथून त्याने इंस्टाग्रामवर लोकेशनचा व्हीडीओ शेअर केल्याने ढीगाऱ्या खालून शोधून काढले असल्याचे अलजजीराने म्हटले आहे, या युट्युबरची आई देखील एका काँक्रीटच्या खांबा खाली अडकल्याचे त्याने या पोस्टद्वारे म्हटले आहे. अमेरीकेने गुरूवारी 85 दशलक्ष अमेरीकन डॉलरची मदत भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवली असल्याचे रॉयटर या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मृत्यूचा आकड्याने 20000 हजाराचा आकडा ओलांडला आहे. तीन दिवसांच्या शोध मोहीमेनंतर अजूनही काही जण जीवंत सापडत आहेत.